maharashtra rajya chi mahiti marathi

महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती | All important general information of Maharashtra In Marathi


महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती | All important general information of Maharashtra In Marathi
महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती | All important general information of Maharashtra In Marathiनमस्कार मित्रांनो  महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती या पोस्ट  मध्ये देणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल च स्पर्धा परीक्षा पोलीस भरती आणि अनेक परीक्षा मध्ये महाराष्ट्र विषयी अनेक प्रश्न येतात. या पोस्ट मध्ये  महाराष्ट्र राज्याची स्थापना, महाराष्ट्र राज्याचे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार, लोकसंख्या, साक्षरता, सीमा, महाराष्ट्र राज्याचे विषेश  इत्यादी महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती खाली दिलेली आहे.महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती


● महाराष्ट्र राज्यची स्थापना  १  मे , १९६० रोजी झाली


महाराष्ट्र राज्याचा विस्तार

महाराष्ट्र राज्याचा विस्तार खालील प्रमाणे आहे.

 • अक्षवृत्तीय विस्तार  - १५°.८ ' उत्तर ते २२°.१'  उत्तर इतका आहे.
 •  रेखावृत्तीय विस्तार - ७२°. ६' पूर्व ते ८०°.९' पूर्व इतका आहे. 
 • क्षेत्रपळ -  ३,०७,७१३ चौ. कि. मी. आहे.
 • समुद्र किनारा ( जलसीमा ) - ७२० कि. मी.
 • दक्षिणोत्तर अंतर  - सुमारे ७०० कि.मी. आहे
 • पूर्व-पश्चिम अंतर - सुमारे ८०० की.मी. आहे.

 • महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
 • महराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
 • एकूण जिल्हे - ३६
 • तालुके - ३५८
 • प्रशासकीय विभाग - ०६
 • जिल्हा परिषद - ३३+१ ( मुंबई शहर व मुंबई उपनगर )Reed Also : MPSC Book List


Reed Also : 5 Vi Te 10 Vi Vidnyanache Pustak Pdf Download - 5th Std To 10th Std Science Text books Maharashtra Board PDF Download


महाराष्ट्राची लोकसंख्या


२०११ च्या जगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या खालील प्रमाणे आहे.

 • एकूण लोकसंख्या - ११,२३,७२,९७२
 • पुरुष लोकसंख्या - ५,८३,६१,३९७
 • स्त्री लोकसंख्या - ५,४०,११,५७५
 • पुरूष : स्त्री प्रमाण - १००० : ९२५
 • ग्रामीण लोकसंख्या - ५४.७७℅
 • शहरी लोकसंख्या - ४५.२३℅ 
 • लोकसंख्या : घनता - ३६५ व्यक्ती ( प्रति चौ. कि. मी. )
 • २००१ - २०११ मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत झालेली वाढ - १५.९९℅ 
 • महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत भारतात दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे.
 • भारताच्या एकूण लोकसंख्ये पैकी महाराष्ट्रातील लोकसंख्या - ९.२९℅


महाराष्ट्राची साक्षरता


२०११ च्या जंगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता खालील प्रमाणे आहे. 

 • एकूण साक्षरता - ८२.९१℅
 • पुरुष साक्षरता - ८९.८२℅
 • स्त्री साक्षरता - ७५.४८%
 • ग्रामीण साक्षरता - ७७.०९℅
 • शहरी साक्षरता - ८९.८४℅


महाराष्ट्राची सीमा 

महाराष्ट्र राज्याची सीमा ६ राज्यांना लागून आहे.

 • पूर्वेस व ईशान्येस - छत्तीसगड
 • पश्चिमेस - अरबी समुद्र
 • दक्षिणेस - गोवा आणि कर्नाटक
 • आग्नेयेस - आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
 • उत्तरेस - मध्यप्रदेश
 • वायव्येस - गुजरात, दादरा-नगर हवेली संघराज्य प्रदेशमहाराष्ट्र विशेष

 • महाराष्ट्र राज्याचा वृक्ष - आंबा
 • महाराष्ट्राचा राज्य पक्षी - हारावत
 • महाराष्ट्राचे राज्य फुल - मोठा बोंडारा किंवा तामन
 • महाराष्ट्राचा राज्य प्राणी - शेकरू ( मोठ्या आकाराची खार ) 
 • महाराष्ट्राची राज्यभाषा - मराठी
Tags
close button