शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabd Samuh Badal Ek Shabd PDF

Shabd Samuh Badal Ek Shabd: Marathi Grammar ( मराठी व्याकरण ) मधील एक भाग आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षा ( MPSC ) साठी उपयुक्त आहे.

Table Of Contents (toc)

Shabd Samuh Badal Ek Shabd

मित्रानो मी तुम्हाला खाली शब्दसमूहाबद्दल एक शब्द  ची सर्व उदाहरणे दिले आहेत. आणि आणखी काही उदाहरणे आम्ही या पोस्ट मध्ये जोडणारा अहोत. Pdf सुध्दा आम्ही वेळोवेळी update करत राहणार आहोत.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ? 

Shabd Samuh Badal Ek Shabd म्हणजे: एका मोठ्या वाक्याचे एक शब्दात रूपांतर करणे.

उदाहरणात: 

  1. कामात तत्पर असलेला – कार्यतत्पर

कामात तत्पर असलेला या वाक्यात 3 शब्द आले आता जर याला एक शब्दात सांगायचे झाले तर याला कार्यतत्पर असे म्हणतात.

तुम्हाला जर या पोस्ट मधील Shabd Samuh Badal Ek Shabd In Marathi Pdf Download करायची असेल तर मी Shabd Samuh Badal Ek Shabd List च्या खाली Download link दिली आहे आणि तुम्हाला Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf कशी  Download करायची हे ही सांगितले आहे.

Shabd Samuh Badal Ek Shabd

Shabd Samuh Badal Ek Shabd

शब्दसमूहाबद्दल एक शब्द
शब्दसमूह एक शब्द
कामात तत्पर असलेला कार्यतत्पर
आकाशगमन करणारा खग, पक्षी.
कथा लिहिणारा कथा लेखक, कथाकार
कुटुंबाच्या पारंपारिक
धार्मिक प्रथा व परंपरा
कुलाचार
कुंजात विहार करणारा कुंजविहारी
कविता गाऊन दाखवणारी काव्यगायिका
ज्याच्याकडे अनेक
कोटी रुपये आहेत असा
कोट्याधीश
कार्यात गढून गेलेला कार्यमग्न, कार्यरत
कोणत्याही क्षेत्रामध्ये
अचानक होणारा मोठा
बदल
क्रांती
किल्ल्याभोवती खणलेला
पाण्याचा कालवा
खंदक
मडकी तयार करणारा कुंभार
इच्छित वस्तु देणारी
काल्पनिक गाय
कामधेनू
मनातल्या मनात
होणारा त्रास
कोंडमारा
खोटी तक्रार करणारा कांगावाखोर
धान्य किंवा तशा वस्तु
साठविण्याची जागा
कोठार
हिताची गुप्त गोष्ट कानगोष्ट, हितगुज
दर सहा महिन्यांनी
प्रसिद्ध होणारे
षण्मासिक
थोडयावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट
राज्यातील लोक प्रजाजन,रयत,प्रजा
कविता करणारी कवयित्री
पुरामुळे नुकसान झालेला पूरग्रस्त
जमीन व पाणी अशा
दोन्ही ठिकाणी
राहणोर प्राणी
उभयचर
कपडे शिवण्याचे
काम करणारा
शिंपी
अनेक बाबींवर एकाच
वेळी लक्ष ठेवणारा
अष्टावधानी
कविता करणारा/ रचणारा कवी
सतत निंदानालस्ती करणारा निंदक
केलेले उपकार विसरणारा कृतघ्न
अनेक फळांचा समूह घोस
स्वत: संपादन केलेली स्वार्जित,स्वसंपादित
वाद्य वाजवणारा वादक
डोंगरकपारीत राहणारे प्राणी गिरिजन
स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन
पायी चालणारा पादचारी
मालाचा साठा करून
ठेवण्याची जागा
गुदाम,कोठार,वखार
स्वतःचा स्वार्थ न पाहणारा निःस्वार्थी
मातीची भांडी करणारा कुंभार
लिहिता-वाचता न येणारा निरक्षर
दारावरील पहारेकरी द्वारपाल, दरवान
शत्रूकडील बातमी काढणारा हेर
कोणावरही अवलंबून
असलेला
स्वावलंबी
खूप आयुष्य असणारा दीर्घायुषी
घरापुढील मोकळी जागा अंगण
मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय
स्वत:ची बुध्दी न वापरता
सांगितले तेवढेच काम करणारा
सांगकाम्या
माकडाचा खेळ करणारा मदारी
अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी
लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य
दुस-याला काहीही
सहजगत्या देणारा
उदार,दिलदार
जमिनीवर राहणारे प्राणी भूचर
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर
बातम्या सांगणारा
वृत्तनिवेदक
आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी
जेथे वस्तू विकल्या
जातात ती जागा
दुकान
स्तुती गाणारा भाट
आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र
हाताच्या बोटात
घालायचं दागिना
अंगठी
दुस-यावर उपकार करणारा परोपकारी
सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथालेखक
सूर्य मावळण्याची घटना सूर्यास्त
अनेक फुलांचा समूह गुच्छ
दोन किंवा अनेक
नद्या एकत्र येतात ते
ठिकाण
संगम
कादंबरी लिहिणारा लेखक कादंबरीकार
अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित
जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार
अरण्याची शोभा वनश्री
झाडांची निगा राखणारा माळी
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष
मूर्ती बनवणारा मूर्तिकार
कापड विणणारा विणकर
रणांगणावर आलेले मरण वीरमरण
हिंडून करायचा पहारा गस्त
हरिणासारखे डोळे असणारी मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना,
कुरंगनयना
देशाची सेवा करणारा देशसेवक
एकत्र येतात ती जागा तिठा
लाज नाही असा निर्लज्ज
स्वतः श्रम न करता खाणारा ऐतखाऊ
ठरावीक काळाच्या
अंतराने प्रकाशित होणारे
नियतकालिक
दर तीन महिन्यांनी
प्रसिद्ध होणारे
त्रैमासिक
कल्पना नसताना आलेले संकट घाला
कष्ट करून जगणारा श्रमजीवी
नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा
स्वत:बददल अभिमान असलेला स्वाभिमानी
होडी चालवणारा नावाडी, नाखवा,नाविक
कैदी ठेवण्याची जागा तुरुंग
धान्य साठवण्याची जागा कोठार
वाडवडिलांनी मिळवलेली वडिलोपार्जित
मासे पकडणारा कोळी
कथा ( गोष्ट ) लिहिणारा कथाकार, कथालेखक
मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक
स्वत:बददल अभिमान नसलेला स्वाभिमानशून्य
सोन्याचांदीचे दागिने करणारा सोनार
खूप पाऊस पडणे अतिवृष्टी
विमान चालवणारा वैमानिक
मोजता येणार नाही असे अगणित,असंख्य
केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ
मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय
कमी वेळ टिकणारा अल्पजीवी, छणभंगुर
स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी
चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुक्लपक्ष
ज्याला एकही शत्रू नाही असा अजातशत्रू
रक्षण करणारा रक्षक
पाण्यात राहणारे प्राणी जलचर
पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक
हत्तीला काबूत ठेवणारा माहूत
अनेक केळ्यांचा समूह घड
देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप
शत्रूला सामील झालेला फितूर
जे प्रत्यक्षात नाही ते आहे
असे भासणे
आभास
पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व, अपूर्व  
पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी
अनेक माणसांचा समूह जमाव
घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित
तिथी (दिवस, वेळ)
न ठरवता (अचानक)
आलेला
अतिथी
केवळ स्वतःचाच फायदा
करू पाहणारा
स्वार्थी
खूप दानधर्म करणारा दानशूर
चित्रे काढणारा चित्रकार
दगडावर कोरलेले लेख शिलालेख
नाटके लिहिणारा नाटककार
लाखो रूपयांचा धनी लक्षाधीश
रोग्यांची शुश्रुषा करणारी परिचारिका
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते अवर्णनीय
विनामुल्य पाणी
मिळण्याची जागा
पाणपोई
लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक
कथा ऐकणारे श्रोते
ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक
चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक
ज्याला लाज नाही असा निर्लज्ज
उंचावरून पडणारा
पाण्याचा प्रवाह
धबधबा
तीन रस्ते एकत्र
मिळतात ते ठिकाण
तिठा
पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक
चरित्र लिहिणारा चरित्रकार
लढण्याची विदया युध्दकला
प्रेरणा देणारा प्रेरक
कर्तव्याकडे पाठ फिरवणार कर्तव्यपराडमुख
घोडे बांधायची जागा पागा, तबेला
सुखाच्या मागे लागलेला सुखलेालुप
ज्याला आईवडील नाहीत असा अनाथ,पोरका
शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचाण
कथा सांगणारा कथेकरी
बसगाड्या थांबण्याची जागा बसस्थानक
हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत
होडी चालवणारा
नावाडी
ढगांनी भरलेले ढगाळलेले, अभ्राच्छादित
बातमी आणून देणारा/देणारी वार्ताहर
मन/चित्त आकर्षित करणारा मनोहर, चित्ताकर्षक,
मनोवेधक, चित्तवेधक
लाकूडकाम दरणारा सुतार
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत आबालवृद्ध
नदीतील खोलगट
भागातील खोल पाणी
डोह
संकटे दूर करणारा विघ्नहर्ता
कपडे धुण्याचे काम करणारा धोबी
शेती करणारा शेतकरी
दुस-यावर अवलंबून असणारा परावलंबी
ज्याच्या हाता चक्र आहे असा चक्रपाणी, चक्रधर
कसलीच इच्छा नसलेला निरिच्छ
घरे बांधणारा गवंडी
ज्याला मरण नाही असा मूकबधीर
स्वत:च्याच फायदयाचा
विचार करणारा
स्वार्थी
दगडावर मूर्ती घडवणारा शिल्पकार
अंग चोरून काम करणारा अंगचोर
कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य
शोध लावणारा संशोधक
रात्रीचा पहारेकरी जागल्या
दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम
खूप मोठा विस्तार असलेले ऐसपैस,विस्तीर्ण
कोणत्याही क्षेत्रात एकदम
होणारा इष्ट बदल
क्रांती
लिहिता-वाचता येणारा साक्षर
वनात राहणारे प्राणी वनचर
कर्तव्य तत्परतेने पार पडणारा कर्तव्यदक्ष
व्याख्यान देणारा व्याख्याता
कुस्ती खेळण्याची जागा हौद,आखाडा
कमी आयुष्य असणारा अल्पायुषी
भाषण ऐकणारा श्रोता
पहाटेपूर्वीची वेळ उष:काल
फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त, अन्नछत्र
ज्याला कधी म्हातारपण
येत नाही असा
वजर
नदीची सुरवात होते ती जागा उगम
समाजाची सेवा करणारा समाजसेवक
लागत नाही असा अथांग
पालन करणारा पालक
पाऊस अजिबात न पडणे अवर्षण
अरण्याचा राजा वनराज
जमिनीचे दान भूदान
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक
बोलता येत नाही असा मुका
गुरे राखणारा गुराखी
अनेक गुरांचा समूह कळप
गाईसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास
योजना आखणारा योजक
सतत काम करणारा दिर्घोद्योगी
ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट
भाषण करणारा वक्ता
पायात चपला वा बूट न
घालता चालणारा
अनवाणी
मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपुजक
जमिनीखालील गुप्त मार्ग भुयार
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक
गोलकार फिरणारा सोसाटयाचा वारा वावटळ
श्रमांवर जगणारा श्रमजीवी
ऐकायला येत नाही असा बहिरा
लोकांचा आवडता लोकप्रिय
दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक
सूर्य उगवण्याची घटना सूर्योदय
लग्नासाठी जमलेले लोक वर्हाडी
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते अविस्मरणीय
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा अभिनेता
दुष्काळात सापडलेले दुष्काळग्रस्त
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक
अनेकांमधून निवडलेले निवडक

★★★★★★★★★★★★★★


Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf Download

शब्दसमूहाबद्दल एक शब्द Pdf Download करण्यासाठी 2 Steps दिल्या आहेत ते तुम्ही Steps Follow करून Pdf Download करू शकता.

Step 1

खाली दिलेल्या Download Shabd Samuh Badal Ek Shabd Pdf वर क्लीक करा.

PDF Preview

Download PDF(download)

निष्कर्ष 

Shabd Samuh Badal Ek Shabd म्हणजे काय ? शब्दसमूहाबद्दल एक शब्द ची यादी आणि Pdf हे मी या पोस्ट मध्ये दिले आहे. जर या पोस्ट मध्ये काही  Shabd Samuh चुकले असतील तर आम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माहित असलेले शब्दहसमूह कॉमेंट करा.

Jai Hind Jai Maharashtra

Leave a Comment

error: Content is protected !!