Navratri Aarti – Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho Lyrics, Singers

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो (Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho) Lyrics दिली आहे

Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho Lyrics
Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho Lyrics

Table Of Contents(toc)


Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho Lyrics

 उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो

उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो

प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो

मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो

ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||उदो बोला

द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो

सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो

कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो

उदो:कार गर्जती सकळा चामुंडा मिळूनी हो || २ ||उदो बोला

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो

मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो

कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||उदो बोला

चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो

उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो

पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो

भक्तांच्या माउली भक्त लोटांगणी हो || ४ ||उदो बोला

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो

अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो

रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो

आनंदे प्रेम ते आले सद् भावे क्रिडता हो || ५ ||उदो बोला

षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो

घेउनि दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो

कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो

जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||उदो बोला

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो

तेथे तु नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो

जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो

भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरचेवरी हो || ७ ||उदो बोला

अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो

सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो

मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो

स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||उदो बोला

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो

सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो

षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो

आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो || ९ ||उदो बोला

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो

सिंहारूढ दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो

शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||उदो बोला

Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho Credits

  • SONG: Udo Bola Udo
  • ALBUM: Shri Devi Upasna
  • SINGER: Anuradha Paudwal 
  • MUSIC: Nandu Honap
  • LYRICS: Traditional
  • MUSIC LABEL: T-SERIES
Navratri Aarti – Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho YouTube VideoNavratri Aarti – Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho YouTube Video Details

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो (Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho)  ही नवरात्री आरती T-Series Bhakti Marathi या Youtube चॅनल वर 13 डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित करण्यात आली.

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो ही पारंपरिक आरती अनुराधा पौडवाल यांनी गायली आहे आणि नंदू होणाप यांनी या नवरात्री पारंपरिक आरती ला संगीत दिले आहे.

निष्कर्ष 

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो या आरती चे बोल ( Lyrics ) दिले आहे तुम्हाला ही पोस्ट आवडीला असेल तर तुमच्या मित्र व नातेवाईकां सोबत नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!