1001 मराठी उखाणे | Marathi Ukhane For Female | Marathi Ukhane For Male

आजच्या या लेखात मराठी उखाणेमराठी उखाणे नवरी साठी मराठी उखाणे नवरदेव साठी , नवनवीन उखाणे, छान छान उखाणे, नवीन उखाणे, उखाणे मराठी कॉमेडी (Funny Ukhane), लग्नाचे उखाणे, बारश्याचे उखाणे, रोमँटिक उखाणे असेच काही वेगवेगळे उखाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग वाचूया मराठी उखाणे.


Table of content(toc)


Marathi Ukhane for Marriage - लग्नाचे उखाणे




मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,

…. बरोबर संसार करीन सुखाचा. 


सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,

.......... रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.


कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट.... नाव घेते बांधते......... च्या लग्नाची गाठ.


Marathi Ukhane For Female



नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते

..... च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते


लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,

..........चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.


पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.


गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,

….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.


नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,

.......रावांना शेवटी अहोच म्हणायचे.


चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,

----- रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.


हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,

…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!


चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,

…. चं नाव घेते देवापुढे. 


Marathi Ukhane For Female



हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,

…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल. 


मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,

…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.


वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,

…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. 


सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात

..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात

..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात

.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!


घातली मी वरमाला हसले …. राव गाली,

थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली. 


शेल्या शेल्याची बांधली गाठ,

.......नाव मला तोंडपाठ.


वाट जीवनाची झाली सुखद आनंदी

.... च्या सवे चालते मी सप्तपदी... !!


गावठी गुलाबाला सुगंध सुवास,

…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.  



Marathi Ukhane for Male  (पुरुषांसाठी मराठी उखाणे - नवरदेवासाठी उखाणे)



खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,

आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन. 


आंबा गोड, ऊस गोड,

त्याहीपेक्षा अमृत गोड,

.....चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 


चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 


पाच बोटातून होते कलेची निर्मिती,

…. वर जडली माझी प्रीती. 


तू पुण्याची मिसळ,

मी मुंबईचा वडापाव,

लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.


फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,

…. च्या नादाने झालो मी बेभान.


अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,

हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 


केसर दुथात टाकलं काजू,

बदाम, जायफळ,

हिचं नाव घेतो,

वेळ न घालवता वायफळ. 


काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,

.....चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 


संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,

माझी …. म्हणते मधुर गाणी. 


वादळ आलं,

पाऊस आला,

मग आला पूर… हिचं नाव घेतो,

भरून तिच्या भांगेत सिंदूर. 


श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,

आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 


काट्यात काटा गुलाबाचा काटा,

हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,

…. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 


अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,

.... ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 


ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,

तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली. 



कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,

...... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.


हा दिवस आहे आमच्याकरिता खास,

.... ला देतो गुलाबजामचा घास


परातीत परात चांदीची परात,

…. लेक आणली मी …. च्या घरात.


…. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,

तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 


Marathi Ukhane for Female -  (नवरीसाठी मराठी उखाणे - महिलांसाठी उखाणे - नवरीचे उखाणे)



चांदीचे जोडवे पतीची खूण,

…. रावांचे नाव घेते …. ची सून. 


अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,

…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!


गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,

........ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 


कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,

…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 


यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब

.... चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट,

…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 


आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,

याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर. 


सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.

…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 


इंग्रजीत म्हणतात मून,

…. चंं नाव घेते …. ची सून. 


बारीक मणी घरभर पसरले,

…… साठी माहेर विसरले. 


पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,

….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.


परसात अंगण, अंगणात तुळस,

…. नाव घ्यायचा मला नाही आळस.


आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,

…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 


वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,

..... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.


चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.

….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 


चंदनी पानात मुग्ध कळी हसली,

…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 


बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।

.....रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.


हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,

…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 


रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,

…. च्या साथीने आदर्श संसार करीन. 


वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान

.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!


लग्नात लागतात हार आणि तुरे,

…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 


आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,

…. चं नाव घेते कुंकू लावून. 



Ukhane In Marathi for Pooja - मराठी उखाणे पूजे साठी


जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण

.....नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण. 


ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,

….. चे नाव घेते …. च्या दिवशी. 


दत्तदिगंबराला औदुंबराची सावली,

पूजेच्या दिवशी नाव घेते, 

....... रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.


मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
.......नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी



आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,

…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी. 


..... सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन. 

.....माझा हीरो मी त्याची हिरॉईन


नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!





मंगळागौरीसाठी मराठी उखाणे - Marathi Ukhane for Manglagaur





मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,

....च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!


सासर आहे छान, सासू आहे होशी,

…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.


मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते,

..... नावाने मंगळागौर सजवते.


सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.


निलवर्ण आकाशात चमकतो शशी

....नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.




हळदीकुंकवासाठी खास मराठी उखाणे (Ukhane In Marathi for Haldi Kunku)





अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो

.....नी माझी जोडी.



लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,

........... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी

.....च्या जीवनात....ही गृहिणी.


जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला

....च्या नावाला.


सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,

….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.





मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास मराठी उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi)



तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,

…. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.


सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,

…. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.


गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,

…. चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.


पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,

चातकपक्षाची काया,

....रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!


तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,

…. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा. 





बारश्याचे उखाणे (Marathi Ukhane for Baby Naming Ceremony)




दोन शिंपले एक मोती,

दोन वाती एक ज्योती,

दोघांची नावे घ्यायची,

आमच्या जीवनात आला तिसरा साथी.


शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,

…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.




बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,

.... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.


कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,

.... चं नाव घेते .... च्या बारशाच्या दिवशी. 


मावळला सूर्य उगवला शशी,

…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.


हिरवं लिंबू गारसं,

.... रावांच्या बाळाचं आज बारसं.


बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,

……. रावांच्या संसारात पडली नवी भर.


दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,

आज …. च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.


नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,

.... चं नाव घेते बारशाचं कारण. 


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,

.... चं नाव घेते ....च्या बारशाच्या दिवशी. 






फुगड्यांचे मराठी उखाणे (Fugdyanche Marathi Ukhane)


आम्ही दोघी मैत्रिणी माडीवर माडीवर, फोटो काढू साडीवर साडीवर.


खोल-खोल विहीरीला उंच उंच चिरे, तुझी नि माझी फुगडी गरा गरा फिरे.


सासूने दिली सोन्याची बांगडी, तुझी नि माझी पहिली फुगडी.


बटाट्याची भाजी आंबली कशी - आंबली कशी, माझी मैत्रीण दमली कशी - दमली कशी.


तुझी माझी फुगडी गिरकेदार, सगळ्यांना आवडे फारच-फार. 


चांदीचा हार माणकांनी भरा, फुगड्या खेळायला सुरूवात करा.


Romantic Marathi Ukhane (रोमँटिक मराठी उखाणे)


फुलासंगे मातीस सुवास लागे,

…. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे. 


तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,

पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट. 


सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?


लग्नाचा वाढदिवस करू साजरा,

…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा. 


पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,

….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!


झाली प्रभात..विहंग उडाले गात,

…. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!


एका वर्षात असतात महिने बारा,

…. च्या नावात समावलाय आनंद सारा. 


काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,

…. च्या साह्याने सुखी झाले जीवन. 


मंद आहे वारा संथ चाले होडी,

परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी. 


धरला यांनी हात वाटली मला भीती,

हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती. 


यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,

जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.

आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू. 


मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,

....च्या स्पर्शाने उमटले झंकार..!


दही,साखर, तूप,

….. राव मला आवडतात खूप. 


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,

…. सारखा हिरा. 


शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,

…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड. 


यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,

…. सोबत सुखी आहे सासरी. 




Marathi Funny Ukhane (कॉमेडी उखाणे - उखाणे मराठी कॉमेडी)



आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,

…. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा. 


Shinchan चा कुत्रा आहे shiro,

याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow



मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून,

… रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून. 


केळीचं पान टरटर फाटतं,

…. ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.


Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,

याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka. 


हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,

मी आहे लंबू आणि …. किती टिंगू. 


समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,

…. राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.


बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,

…. रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. 


मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,

…. भाव देत नाही किती केले ट्राय.


ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.

कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान. 


काल होती फ्रायडे नाईट,

करून आले मी पार्टी,

यांनी दिलं मला लिंबूपाणी,

कारण नवरा माझा स्मार्टी.


घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,

आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.


कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,

याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.  


त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,

जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.  


साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,

…. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा. 


पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,

….. आहेत आमचे फार नाजूक.


भल्या पहाटे करावी देवाची पूजा,

….. रावांच्या जीवावर करते मी मजा. 


साखरेचे पोते सुईने उसवले,

…. ने मला पावडर लावून फसविले. 


लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,

तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.


खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,

ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.




हेही वाचा

Funny birthday wishes in marathi

Motivational quotes in marathi 

Good evening wishes in marathi

Funny comments in marathi

Vakprachar In Marathi

Happy birthday wishes in marathi





निष्कर्ष

मराठी उखाणेमराठी उखाणे नवरी साठी मराठी उखाणे नवरदेव साठी नवनवीन उखाणेछान छान उखाणे, नवीन उखाणे, उखाणे मराठी कॉमेडी (Funny Ukhane)लग्नाचे उखाणेबारश्याचे उखाणे, रोमँटिक उखाणे हे या लेखात दिलेले सर्व मराठी उखाणे सोशल मीडिया वरून घेलते आहे.

हे मराठी उखाणे तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणी सोबत शेयर करा.

close button