500+ नवरीसाठी मराठी उखाणे – Marathi Ukhane For Female

आज आम्ही नवरीसाठी मराठी उखाणे/ स्त्रियांसाठी मराठी उखाणे दिले आहेत. या पोस्ट मध्ये Marathi ukhane for female, मराठी नवीन उखाणे,उखाणे मराठी sankranti,उखाणे मराठी नवरीचे,पारंपारिक उखाणे,सोपे उखाणे,उखाणे मराठी नवरदेव,ऐतिहासिक उखाणे, marathi ukhane for bride, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, marathi ukhane funny,marathi ukhane for wife marathi ukhane list, smart marathi ukhane. दिले आहे. या पोस्ट मध्ये दिलेले मराठी उखाणे सोपे आहेत हे नवरीसाठी उखाणे सहज लक्षात ठेवता येईल तर खाली दिलेले नवरीसाठी मराठी उखाणे लक्षपूर्वक वाचून आपल्याला आवडलेले उखाणे पाठ करा.

नवरीसाठी मराठी उखाणे – Marathi Ukhane For Female

शेल्या शेल्याची बांधली गाठ,

…….नाव मला तोंडपाठ.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…. चं नाव घेते देवापुढे.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून.
घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
इंग्रजीत म्हणतात मून,
…. चंं नाव घेते …. ची सून.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

Marathi Ukhane For Bride

marathi%2Bukhane%2Bfor%2Bfemale
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.
परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.
आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
…….याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चातकाची काया,
………… च्या साठी सोडले आई-वडिलाचे घर, तरी सुटत नाही माया.
नवीन निघाली कादंबरी वाचन करते पूरी,
…….रावांचे नाव घेते……..च्या घरी.
चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा,
……. रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा.
आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,
……… राव पती मिळाले हेच माझे भूषण,
गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
……… रावांच्या संसारात आहे मी दंग.
वसंत ऋतुच्या आगमनाने शितल होते धरणीची काया
……..रावांचे नाव घेऊन पडते…… च्या पाया
क्षणाची विद्युलता ब्रह्मांड उजळी,
……….. चं नाव घेते …….. च्या वेळी.
वसंत ऋतूत कोकिळा करते गुंजन,
…….. रावण सह करते…….पूजन,
सासराला जाताना सोडावे लागे माहेर,
…….राव जीवनात मला प्रीतीचा आहेर.
लोकनाट्यातील प्रकार आहे सवाल-जवाब,
……… रावांचा आहे……. तालुक्यात मोठा रुबाब.
हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.
हिंदूस्थान देशात सोन, चांदी, हिरे, मोती महागले,
………. रावांसारखे रत्न हाती लागले.
सासू माझी मायाळू, दीर आहेत हौशी,
……. रावांचे नाव घेते……… दिवशी.
चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.
महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले,
…….. च्य जीवासाठी आई-वडिल सोडले
उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….हजाराची कंठी,
…………. रावांच्या गळ्यात.
शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,
……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.
सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान,
……… चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
जगाचे अंगण, मनाचे वृंदावन,
………. रावांचे नाव हेच माझे भूषण.
कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मी च्या गळ्यात,
………चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.
हिन्याला कोंदण सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे,
……. नाव घेते सर्वांच्या आग्रहाचे.
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.
वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड,
……… रावांच्या जीवनाला माझी जोड.
आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला,
…….चे नाव घेते सांगाल त्या वेळेला.
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते,
…………चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.
रोहिणीला साथ चंद्राची, सागराला साथ सरितेची,
अखंड लाभो साथ मला……….. रावांची.
मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,
…….. साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,
नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय,
……….च्या सहवासात जीवन झाले सुखमय.
आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,
……..नाव घेते तुमच्यासाठी खास.
गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
……..रावांच नाव घेते ……..दिवशी,
सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

Marathi Ukhane For Bride

नागपूरची संत्री, जळगावची केळी,
………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.
गुलाब असतो काटेरी, मागेरा असतो सुगंधी,
……….. रावांच्या जीवनात मी आहे आनंदी.
सतारीचा नाद, वीणा झंकार,
……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.
दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,
……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,
………… नाव घेते सर्वांच्याकरिता.
निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,
……….. चं नाव घेते ………. च्या घरी.
आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,
………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,
……….चं नाव घेते ………. दिवशी.
सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात,
………. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.
रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
………..चं नाव घेते ……..सणाला.
सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,
जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.
प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग
जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.
संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,
………… हेच पती सात जन्मी हवे.
दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,
……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.
भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,
………… नाव घेते सर्वांच्याकरिता.
प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग
जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.
सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,
……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.
सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,
जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.
सतारीचा नाद, वीणा झंकार,
……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.
निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात,
………. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.
संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,
………… हेच पती सात जन्मी हवे.

Best Marathi Ukhane For Bride

रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
………..चं नाव घेते ……..सणाला.
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,
………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,
……….चं नाव घेते ………. दिवशी.
निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,
…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,
……….. चं नाव घेते ………. च्या घरी.
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
….. रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद
आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले,
……….मुले मला सौभाग्य चढले.
दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….रावांच्या नावाला आग्रह नको फार.
विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर,
………… च्या साठी आई-वडिल केले दूर.
प्रेमरूपी संसार, संसार रूपी सरिता,
…………. चं नाव घेते खास तुमच्याकरिता.
आकाश आले भरुन, चंद्र लपला ढगात,
………… ना हार अर्पण करून धन्य झाले जगात.
दारातील तुळशीला पाणी घालते गार,
…….. रावांच्या नावाला रात्र झाली फार.
तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून,
……..रावांचं नाव घेते तुमचा मान राखून,
शुभ मंगल प्रसंगी सर्वजण करतात आहेर,
……… च्या जीवनाकरिता सोडले मी माहेर.
पतिवृत्तेचा धर्म नम्रतेने वागते,
…….राव सुखी राहोत हा आशिर्वाद मागते.
……..चं नाव घ्यायला…….कारण.
संसाररूपी सागरात पती असतो माळी,
……….. चं नाव घेते ……..वेळी.
मंगळसूत्र म्हणजे सासर माहेरची प्रीती,
……. मिळाले पती म्हणून आभार मानू किती.
उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा,
…….चा उत्कर्ष हाच माझा अलंकार खरा.
अरुण रुपी उषा येता सोन्याची प्रभा पसरली,
……… चं नाव घ्यायला मी नाही विसरली.
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
……….. शी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.
अगं अगं मैत्रीणीबाई, तुला सांगते सर्व काही,
………… राव मिळाले तरी तुला विसरत नाही.
गोपाळ कृष्ण आहे बासरीचा छंद,
…………चे नाव घेण्यात मला वाटतो आनंद.
हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्राचा धरीन अभिमान,
……..रावांबरोबर झाले शुभमंगल सावधान.
उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ दर्जा शेतीचा,
…….नी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा.
प्रीतीच्या झुळकेनं कळीचे फूल झालं.
…….च्या संगतीनं जीवन सार्थक झालं.
सुख, समाधान, शांति तेथे देवाची वस्ती.
…………ना अयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.
भारताच्या नकाशाला मोत्याचे तोरण,
श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान,
…….रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान.
सुख समाधान, शांति हेच माझे माहेर,
……… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
सौंदर्याच्या बागेत सूर्यनारायण माळी,
…….चे नाव घेते ……….. वेळी.
संसाराच्या सुखस्वप्नाची स्त्रीच्या मनी आस
…………..चे नाव घेते तुमच्याकरिता खास.
शरदाचे चांदणे मधुवनी फुले निशिगंध,
…….ची नाव घ्यायला मला वाटतो आनंद,
उदार मनाने अहिंसेच्या जगाला करा आहेर,
……..च्या करिता सोडून आले माहेर.
लतावेलींच्या सौंदर्याने नटला हिमगिरी,
…….चे नाव घेते …….च्या घरी,
चांदीच्या तबकात निरंजन आरती,
…….च्या जीवनात …….. सारथी.
सुपभर मोती वेचू कशी ? गळ्यातील ठुशी वकू कशी ?
पायात पैंजण चालु कशी,………… नाव घेते……दिवशी.
लोकमान्यांनी संदेश दिला स्वराज्याचा,
……… नी संदेश दिला आदर्श गृहिणी होण्याचा.
ज्वेलरी च्या दुकानात जाते, पायातील पैंजण पाहते,
…………च नाव……… साठी घेते.
पाकळी पाकळी उमलून फूल होतं आकार,
……. सारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार.
फुलता कमल पुष्प भ्रमराला लागते चाहूल,
…….च्या जीवनी मी टाकले पाऊल.
निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी
……….. चं नाव घेते खास तुमच्यासठी.
असू नये अभिमानी, असावे मात्र स्वाभिमानी, नाव घेते,
………… ची हृदयस्वामिनी.
पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा,
……… चं नाव घेते वाट माझी सोडा.
मंडपाला सोडल्या कमानी त्यावर विजेची रोषणाई,
………चे नाव ऐकण्याची एवढी कसली घाई.
पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब,
………..चे नाव घेण्यास लावत नाही विलंब.
गणेशाचे आगमन शुभकार्याची खूण,
………. चं नाव घेते तुमचा मान राखून.
सनईच्या मंगल सुरांनी लागते मंगल कार्याची चाहूल,
………… च्या जीवनात मी टाकले पाऊल.
गंगा वाहे, यमुना वाहे सरस्वती झाली गुप्त,
…….. रावाच्या पदरी घालून आई-बाप झाले मुक्त.
महादेवाच्या पुढे असतो नंदी,
………. रावाचे नाव घेऊन …….. ला देते संधी.
स्वच्छता आणि टापटीप अरोग्याचे मूळ,
………… रावांसाठी सोडले माहेरचे मूळ.
संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता,
……….. रावांचे नाव घेते खास तुमच्याकरिता
चातक पक्षी पावसाचे पितो पाणी,
…….चे नाव घत ……….. दिनी.
लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी,
………रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.
व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार,
……….. च्या नावाला रात्र झाली फार.

नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Bride

नभांगणाच्या बागेत सूर्यनारायण माळी,
……….. चं नाव घेते……. वर आली पाळी.
 मंगलमाते मंगलदेवी वंदन करते तुला,
………. ना आयुष्य घालून सौभाग्य दे मला.
चांदीच्या तांब्याला नागाची खूण,
……..रावांचे नाव घेते ……..ची सून.
आरक्त गालावर उमटतात लज्जेचे भाव,
……. नी घेतला माझ्या अंतकरणाचा ठाव.
तार्याचे लुकलुकन चंद्राला आवडलं,
………… नी जीवनसाथी म्हणून ला निवडलं.
जिजाऊ होती माता शिवाजी राजाची,
……चे नाव घेते सून……..ची.
नेत्राच्या निरांजन लावते पापणीच्या ताट.
……….. माझ्या ऋणानुबंधनाच्या गाठी.
स्त्रयांचे कर्तव्य पतीसेवा हेच,
………चे आयुष्य वाढो भूषण मला हेच.
जय जवान, जय किसान गर्जतो सारा वेश,
…….. नी अर्पण केला मला सौभाग्याचा देश.
श्रावणधारेच्या वर्जवाणीत पृथ्वी बनते अंजली,
……. व्या संसारी माझी तुळस रंगली.
श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माला,
………चे नाव घेते ………दिनाला / सणाला.
पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर,
……….. रावाचे नाव ऐकण्यासाठी आहेत सर्वजण हजर.
सकाळच्या वेळी बागेत फूल तोडी माळी,
……..रावांचे नाव घेते ………वर आली पाळी.

Comedy Ukhane For Female

निशिगंधाच्या वासाने मन होते मोहित,
………… ना दीर्घायुष्य मागते नातेवाइकासहित.
स्वच्छता आणि टापटीप अरोग्याचे माहेर,
………. नी केला मला सौभाग्याचा आहेर.
सुखाचा पाऊस पडता आनंदाचा येतो पूर,
………… च्या करिता आई-वडिल केले दूर.
निसर्गावर करू पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणून दिला ………. चा हाती हात.
………… रावांच्या जीवावर बांधले मणी मंगळसूत्र.
जीवनाच्या कोंदणात फुलले प्रीतीचे पुष्प,
………. नी अर्पण केला सौभाग्याचा गुच्छ.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी स्वातंत्र्याचे दिवस,
………. पती मिळावे म्हणून ……….ला केला नवस.
सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र,
वाड्यात असते अंगण, अंगणात तुळशीचे वृंदावन,
……….. चा संसार म्हणजे नंदनवन.
जाई लावली अंगणी, मोगरा लावला दारी,
…….चे नाव घेते………च्या घरी.
यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवी पावा,
……….. रावांच्या नावाला तुमचा आशीर्वाद हवा.
महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल वाहते वाकून,
………… रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रुपाचा,
…….. रावांना अशिर्वाद द्यावा दीर्घायुष्याचा.
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
………. राव आहेत माझे ज़ीवनसाथी

Comedy Ukhane for Female

जात होते फुलाला, पदर अडकला वेलाला,
……..चे नाव घेते …. ….वेळेला.
सुवासिक पारिजात बहरो प्रीतीच्या दारी
………… साठी माहेर सोडून आले मी सासरी.
जीवनाच्या पाण्यावर चाले संसाराचे जहाज,
………… नी अर्पण केला सौभाग्याचा साज
मोह, माया, प्रेमाची जाळी पसरली दाट,
……….. ची सेवा करणे हीच मोक्षाची वाट.
परमेश्वराचे सोबती, सुख दु:खाचे भागीदार,
……… च्या जीवनी मी आहे साथीदार.
मला नाही येत, मी नाही घेत, मी आहे साधी, वापरते खादी,
………..चे नाव घेते सर्वांच्या आधी.
शंकर पार्वती च्या पोटी जन्मले गणराज,
……….. नी अर्पण केला सौभाग्याचा साज.
संसाररूपी सागरात, प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते
…….बरोबर.
सोन्याची घागर अमृताने भरावी,
………… रावांची सेवा मी जन्मोजन्मी करावी.

Marathi Ukhane For Female

श्रीरामाच्या पउली वाहते फूल आणि पान,
……… रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
मंगळागौरीची पूजा मनोभावे करते,
………. साठी दीर्घायुष्य ईश्वराकडे मागते.
चांदीचा तांब्या रुप्याची परात,
……..रावांचे नाव घेते……..च्या घरात.
सांजवेळी तुळशीपुढे लावावा दिवा,
……….. रावांचा सहवास वाटते नेहमीच हवा.
ध्येय, प्रेम, आकांक्षाची जिथे होतसे पूर्ती अशा,
………… रावांची मी सौभाग्यवती.

Funny Marathi Ukhane

घराच्या अंगणात असावी तुळस,
……….. रावांचे घ्यायचा कसाला हो आळस.
नंदनवनात फुलली सुवर्णाची कमळे,
………… रावांच्यामुळे संसाराचा अर्थ कळे.
अंगणातील वृंदावनात तुळस लाविली,
………… रावांच्या संसरात आहे शितल सावली.
यमुनेच्या तीरावर कृष्णा वाजवतो पावा,
………… रावांचा सहवास जन्मोजन्मी लाभावा.
थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले,
…….रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
संथ वाहती गंगा, यमुना, सरस्वती,
……. रावांचे नाव हीच माझी महती.
मोत्याच्या माळेला शोभून दिसे सोन्याचा साज,
………… रावांचे नाव घेते …….आहे आज.
दारात असावी तुळस, गोठ्यात गाय,
………… रावांच्या संसारात आणखी हवे काय ?

तुम्हाला आमच्या आणखी Marathi पोस्ट्स नक्की आवडतील

आम्ही आशा करतो की Marathi Ukhane For Female ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल. ही पोस्ट आवडली असेल तर हे नवरीसाठी मराठी उखाणे – Marathi Ukhane For Female पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईका बरोबर शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!