[NEW] सर्व मराठी चारोळ्या (Marathi Charolya On Life, 💕 Love, Relationship, Friendship, Husband Wife’) | Marathi Charolya

Rate this post

 नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही इंटरनेटवर, पुस्तकात उपलब्ध असलेल्या सर्व marathi charolya या पोस्ट मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही जीवनावर चारोळ्या (marathi charolya on life), प्रेमावर चारोळ्या (marathi charolya on love), मैत्री वर charoli marathi कविता शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात आम्ही या पोस्ट मध्ये या सर्व marathi charolya दिल्या आहेत त्या तुम्ही वाचून मनात चांगले विचार आणून चांगले जीवन जगू शकता. 

Table Of Contents(toc)

मराठी चारोळ्या (Marathi Charolya On Life, Love, Relationship, Friendship, Husband Wife’)

 डोळ्यात ज्यांच्या कधी

अश्रू दिसत नाही

याचा अर्थ असा नाही की

त्यांना कधी दुःख होत नाही..

 जंगली हिंस्र जनावर

फक्त शाररिक वेदना देतात

पण समाजातील वाईट लोकं

अवघी बुद्धीच पोखरून घेतात.

हरण्या- जिंकण्यासाठी

कधीच खेळू नये

एकदा पुढे गेल्यावर

शिकल्याशिवाय मागे वळू नये.

 

 इतरांच्या सुखावर जळणारे

इथं बरेच आहेत

दुःखाला सामोरे बघून

इथं पळणारे पण बरेच आहेत.

 कुणाला पैशाची कमतरता,

कुणाला आरोग्याची, अन नात्यांची चिंता

सर्वगुणसंपन्न इथं कुणीच नसते,

मित्रहो जिंदगी ही अशीच असते.

 जीवनाच्या प्रवासात

अनेक लोकं भेटतात

साथ देणारे कमी अन

सोडून जाणारेच जास्त असतात.

 कशीही असली जिंदगी

तरी नेहमी आनंदी राहावं

एक संकट गेलं तर

नेहमी दुसऱ्यासाठी सज्ज असावं.

चारोळी संग्रह

(ads1)

Marathi Charolya On Life

Marathi Charolya On Life
Marathi Charolya On Life

 माझं आणि तुझं

यातच जीवन व्यस्त आहे

पण खरं तर ‘आपण’ म्हटलं

तरच जीवन मस्त आहे.

 दुःख सोसल्याशिवाय

सुखाच महत्व कळत नाही

हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय

दगडसुद्धा देव बनत नाही.

 एकदा अहंकार चढला की मग

माणसाला माणूस दिसत नाही

दिव्याला जसा मग

त्याखालचा अंधार दिसत नाही.

 Kavita On Life In Marathi

 जे मिळालेल आहे

ते सांभाळून ठेवावं

अन जे मिळवायचं आहे

त्यासाठी प्रयत्न करत राहावं.

 न कळणाऱ्या जीवनात

थोडं सांभाळून चालावं

सरळ रस्त्यावर वेगाने तर

वळणावर पाऊल जपून टाकावं.

 कुणी आपल्याला दुखावल्यावर

चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे,

वादळे बरीच येतील जीवनात

त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे.

 दररोजच्या आयुष्यात

फक्त पैसे कमावत न बसावं

आता किती श्वास शिल्लक आहेत

कधीतरी हे ही मोजून बघावं.

 आल्या कितीही अडचणी

तरी आनंदाने लढत राहावं

जीवन आपलंच आहे

त्याच्यावर प्रेम करत राहावं.

(ads1)

Heart Touching Marathi Kavita On Life

Marathi Charolya On Life
Marathi Charolya On Life

 कुणी सत्तर वर्ष जगते

तर कुणी तिशीतच जाते

जो दुसऱ्यासाठी जगते

शेवटी तोच लक्षात राहते.

 कुणी सोबत असेल तर

खूप मस्त आहे जिंदगी

पण फक्त पैसाच असेल सोबती

तर मात्र त्रस्त आहे जिंदगी.

जीवन कविता

 दुःख काय असतं

हे कळतं सगळ्यांना

मात्र दुःखात सुख शोधण

नसेल जमत सगळ्यांना.

 दुःखाने कितीही घेरलं तरीही

चेहऱ्यावर आनंद असावा

जे मिळणार नाही प्रयत्नानंतरही

त्याचाही मनापासून स्वीकार करावा.

 या अस्थिर आयुष्यात

काहीच स्थिर नसतं

कधी दुःखाचा सागर येतो

तर कधी सुखाचं तळं भेटतं.

 जे असतील नाराज

त्यांना एकवेळ समजावून बघावं

तरीही नाही समजतील

तर त्यांच्यापासून कायम दूर राहावं.

Marathi Short Poems On Life

(ads1)

 यश कुणासाठी, अपयश कुणासाठी

जीवनभर फक्त राग का इतरांसाठी

जो आला जन्माला, तो जाईल एकदिवस

मग एवढा मनात अहंकार कशासाठी.

 आपले डोळे बंद झाल्यावर

इतरांच्या डोळ्यात अश्रू यायला हवे

ज्यांनी जीवनभर त्रास दिलाय

त्यांनीही गुणगान गायला हवे.

 ना कुणासोबत तुलना

ना कुणाचा द्वेष करावा

आपल्या ध्येयाचा पाठलाग

मनापासून करत राहावा.

 लढाईत हरलात

तर पुन्हा जिंकता येईल

पण मनाने हरलात तर

जगणं कठीण होईल.

 चेहऱ्यावरचा आनंद

कधी जायला नको

दुःखाला पाहून

डोळ्यात पाणी सुद्धा यायला नको.

 दररोज आपल्याला पाहणारे

बरेच लोकं असतात

पण लक्षात जास्त तेच राहतात

जे पाहून न पाहिल्यासारखे करतात.

 मोठ्या डोंगराच निर्माण जसं

छोट्याश्या दगडापासून होते

तसं मोठं स्वप्न साकारण्याची सुरुवात

पाहिलं पाऊल टाकल्यापासून होते.

 प्रत्येकाने आयुष्यात

खूप व्यस्त असावं,

जे पैश्याने नाही मिळणार

ते कमवून बघावं.

 

 लहान मुलाकडून

एवढंच शिकावं

सर्वांचं प्रेम मिळवण्यासाठी

हसावं आणि गप्प बसून राहावं.

 मानवतेच्या या दुनियेत

माहीत नाही किती दिवस राहू

पण इथून जातांना मात्र

लोकांच्या मनात घर करून जाऊ.

 जीवनात सदैव

आनंदी राहायचं असतं

कारण दुःखाचं गाठोडं इथं

प्रत्येकाच्या नशिबात असतं.

 हातात टच फोन असणं

हे आजच्या वेळी गरजेचं आहे

पण सगळ्यांच्या टच मध्ये राहणं

हे चांगल्या जीवनासाठी गरजेचं आहे.

 नाही सहन झालं दुःख

तर थोडं रडून घ्यावं

दुःख सावरताना मग

सुखासाठी पण तयार असावं.

 जीवनात सर्वांना नेहमी

आनंदच मिळत असतो

इतरांचं सुख पाहून

उगाच आपण दुःखी होतो.

 इतरांशी तुलना करून

इथं बरेच होतात दुःखी

जे स्वतःशी तुलना करतात

तेच असतात सुखी.

(ads1)

 पाहिजे असलेलं मिळवण्यासाठी

कुणाला काबाडकष्ट करावे लागते,

तर कुणाला ते जन्मजातच मिळते

मित्रहो जिंदगी ही अशीच असते.

 भूतकाळाकडून नेहमी

शिकत राहावं

भविष्य घडवण्यासाठी

दररोज प्रयत्न करत राहावं.

 केव्हा संपेल जीवन

कुणालाच समजत नाही

मनासारखं जगून घ्यावं

कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही.

 आहे जे मिळालेलं

ते मनापासून सांभाळावे

जे मिळवायचं असेल त्यासाठी

प्रामाणिक प्रयत्न करत रहावे.

 आयुष्य फक्त

जिंकण्यासाठी नसतं

कधी हरण्यासाठी

तर कधी शिकण्यासाठी असतं.

 

 जीवनाचा प्रवास

स्वतःच करायचा असतो

कुणीतरी सदैव सोबत असावं

असा हट्टसुद्धा धरायचा नसतो.

वाटेवरील प्रत्येक पाऊल

आता सावकाश पडत होते

लक्ष्य अवघड नव्हते

मात्र अनुभव कडवट होते.

 वेळ जीवनात

सर्वकाही शिकवत असते

आणि जे वेळ शिकवते

ते दुसरं कुणीच शिकवत नसते.

 जीवनात जो नेहमी

संघार्षाच्या वाटेवर चालतो

जो काळ्यारात्रीला सुद्धा हरवू पाहतो

तोच उद्याचा सूर्य म्हणून उगवतो.

 गरिबाला जेव्हा

हसताना पाहिलं,

पैशाचं महत्व माझ्यासाठी

तेव्हा कमी झालं.

(ads1)

 सुखात सोबत असणारे

सर्वच खरे नसतात

जे दुःखात साथ देतात

तेच फक्त हिरे असतात.

 दुसऱ्याविषयी बोलतांना

शब्द आठवावे लागत नाही

अन स्वतःविषयी बोलतांना

मग शब्द सुचत नाही.

 कुणी, आपल्यावर कोणाचा

भरवसा नाही म्हणून रडतो

तर कुणी, आपण इतरांवर

भरवसा ठेवला म्हणून रडतो.

 विश्वास स्वतःवर ठेवला

तर कठीण काहीच नाही

आणि दुसऱ्यावर ठेवत राहिले

तर या जगी सोपं काहीच नाही.

Marathi Charolya Kavita

फस्त केली दुःखे 

सारी मी ताटातली 

नशीब पुन्हा पुन्हा 

का बाढून जाते

मी मांडली

 कुंडली डोळसपणे

 आयुष्य अंधपणे

फाडून जाते…

आकाशातले द्योंगावणारे विमान

 आणि त्यामागुन विरत चाललेल्या

 धुरामध्ये हरवलेलं बालपण आठवत राहतं

उंचावूनी हात मारलेली हाक

 हरवलेल्या ढगात हरवलेल्या झाडांत

 काटलेला माग डोळ्यांत साठवत राहतं

मोठे होत गेलो कक्षा रुंदावत गेल्या

 क्षितीजे धुंडाळले स्वप्ने गुंडाळले

 तरी

बालपणीच विमान 

गाठत राहत..

साऱ्या जगाने अश्रू ढाळले होते 

आमच्या जवळी आम्ही ढाळताना

 कोणी नव्हते आमच्या जवळी

दुःख

हे आमचे माणूसघाणे

 नसे आवडे गर्दी त्यास पाहुनी एकांत 

बिलगण्यास येते आमच्या जवळी…

(ads1)

माणसाने फक्त 

इतकं शहाणं असावं

त्याला मूर्ख म्हणल की 

शिवी वाटावी…

Birthday Marathi Kavita Charolya

 

🎂🎂🎉आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण …

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच, पण

आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक “सण” होऊ दे हिच सदिच्छा..

🎂🎂🎉

🎂🎂🎉तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते

Tones of Happy Birthday Wishes Dear Friend🎂🎂🎉

🎂🎂🎉 नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.

याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Wish you Happy Birthday🎂🎂🎉

🎂🎂🎉या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो,

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

याच आमच्याकडून वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! Wish you Many Many Happy Birthday🎂🎂🎉

🎂🎂🎉 जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..

शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे हिच सदिच्छा … 🎂🎂🎉

Marathi Birthday Charoli

(ads1)

🎂🎂🎉 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय

यशस्वी व औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎉

🎂🎂🎉 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय

यशस्वी व औक्षवंत हो

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉

🎂🎂🎉 नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य सदा तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

आपल्या जन्मदिनी ह्याच आमच्या शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉 तुमच्या यशाची पतंग उंच उंच उडत राहावी हीच सदिच्छ

तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य

दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हीच एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना🎂🎂🎉

🎂🎂🎉 तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो…🎂🎂🎉

🎂🎂🎉 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो🎂🎂🎉

🎂🎂🎉 शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे.

तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.

वाडीवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉 प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल, खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎂🎉

🎂🎂🎉 आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे🎂🎂🎉 

🎂🎂🎉 सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन, प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन

असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी, याच शुभेच्या आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी

वाडीवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎉

🎂🎂🎉ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

सरलेल्या वर्षातील दु:ख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे🎂🎂🎉

(ads1)

🎂🎂🎉 नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं

Vadhdivasachya Shubhechya Mitra

🎂🎂🎉 आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली

जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली

तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं

प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं..🎂🎂🎉

🎂🎂🎉तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला

प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎉 

 

🎂🎂🎉फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी

अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी

आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं

आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं

या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती

अन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती🎂🎂🎉

🎂🎂🎉 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो । वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎉

🎂🎂🎉आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे …

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे …

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂🎉

🎂🎂🎉 प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो

तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.

Happy Birthday Wishes Dear Friend🎂🎂🎉

🎂🎂🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

Vadhdivasachya Shubhechya🎂🎂🎉

🎂🎂🎉 लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल खुलावेस तू सुद्धा बनून हसरेसे फुल

दिन आला सोनियाचा भासे धरा हि, सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो हि निशा, घेउनि येवो नवी उमेत नवी आशा, आपल्या वाढदिवशी आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🎂🎂🎉

(ads1)

प्रेमावर चारोळ्या मराठी ( Marathi Prem Kavita Charolya)

प्रेमावर चारोळ्या मराठी ( Marathi Prem Kavita Charolya)
प्रेमावर चारोळ्या मराठी ( Marathi Prem Kavita Charolya)

💕💕 सागरची प्रत्येक लाट

माझ्या ओळखीची होती

कारण ती त्याच्या येवढीच

माझीही होती..💕💕

💕💕समुद्राच्या किनार्‍यावर दिसते

ती गोड लाट पाण्याची,

संदेश घेऊनी येत असावी का?

ती लाट, माझ्या प्रेमाची💕💕

💕💕हसत असतो, पण मनात कुठेतरी

दुःख नेहमीच असतं…

हसता हसता, अचानक

डोळ्यात पाणी दाटतं…💕💕

💕💕सोन्यासारखा संसार करशील

दिल्या घरी नांदताना

सांग माझी आठवण येइल का तुला

ती बागेतली रातराणी फ़ुलताना💕💕

💕💕हल्ली मला भावनांचा

थांगच लागत नाही ,

क्षणभरही मनाला आता

उसंत मिळत नाही .💕💕

💕💕श्रवण म्हणजे मला वाटतं

प्राजक्ताचे दिवस

सृष्टीने कधीतरी करून

फेडलेला नवस💕💕

💕💕संगीत जुनचं आहे

सूर नव्याने जुळतायत…

मनही काहिसं जुनचं

तेही नवी तार छेडतायत…💕💕

(ads1)

💕💕सगळीच वादळं मी

खिडकीत बसुन सोसली

अन् हि बाट्ली सुध्धा

खिडकीत बसुनच ढोसली💕💕

💕💕ह्रदयात एक जखम

आजही सळत होती…

आठवण तुझी, का?

मलाच छळत होती…💕💕

💕💕सोडून तू गेलीस असं ,

काय माझं चुकलं होतं …

तुला हवं ते सारंच ,

आजवर तर मी दिलं होतं …💕💕

💕💕 सवयींचे काय , त्या कशाही जडतात,

हळु हळु अंगवळणीही पडतात,

म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?

एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.💕💕

💕💕समईला साथ असते ज्योतीची,

अंधाराला साथ असते प्रकाशाची,

चंद्राला साथ असते चांदण्याची,

प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची..💕💕

💕💕सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल

केव्हा उमलल कळलच नाही,

तु माझी, तु माझी म्हणताना,

मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..💕💕

Marathi Charolya On Love

Marathi Charolya On Love
Marathi Charolya On Love

💕💕होकारांला शब्दांना महत्व नसते

दाटल्या भावानांना काही बंध नसते,

डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,

प्रेमात शब्दांची गरज नसते..💕💕

💕💕स्वप्नांच्या मागे धावु नकोस,

स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहीत…

उरतात ते फक्त उसासे,

अश्रु पण खाली ओघळत नाहीत….💕💕

 (ads1)

💕💕हृदयात नेहमीच तुझ्यासाठी

थोडी जागा जपून ठेवतो…

कधीतरी येशील म्हणून त्या

जागेवर फुले पांघरूण ठेवतो…💕💕

💕💕हातात हात घेशील जेव्हा

भिती तुला कशाचीच नसेल…

अंधारातला काजवाही तेव्हा

सुर्यापेक्षा प्रखर असेल…💕💕

💕💕सारखचं वाटतं पाऊस पडावा,

तू सोबत असताना…

ओढणी धरावीस डोक्यावर

पावसाचा थेंब पडताना….💕💕

💕💕हात हजार मिळतात

अश्रू पुसण्यासाठी

डोळे दोनही मिळत नाहीत

सोबत रडण्यासाठी💕💕

💕💕हिवाळ्यातील ही गुलाबी हवा

सोबत तू ही असावी..

घट्ट मारलेल्या मिठीत

शिरण्यास थंडीसही जागा नसावी..💕💕

💕💕सोबत नसतेस तरी ,

तुझा स्पर्श जाणवतो…

का? आजही हा जीव,

तुझ्यासाठी तळमळतो…💕💕

💕💕सुंदर लाटेवर भाळून

सूर्य तिच्याकडे आकर्षला

दिवसाची खुप आश्वासन

देऊन रात्री मात्र फितूर झाला💕💕

💕💕श्वासात फक्त मी नाही माझा

प्राण तुझ्यात जडला आहे,

शरीरं असल माझ, मनाने

तुझ्या रुपात हरवलो आहे💕💕

💕💕सांग कसा गं राहू, तुझ्या

प्रेमापासून दूर असा..

वाट पाहणाऱ्या हृदयाला,

मी समजावणार कसा..💕💕

💕💕हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात

तुझीच आठवण ताजी आहे…

शरीराने कितीही दूर गेलीस तरी,

मनाने अजूनही तू माझीच आहे…💕💕

💕💕सांगितले वारंवार तुला

तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही

प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास

तो माझ्यावर तु ठेवलास नाही..💕💕

💕💕हातात पेन घेतले आणि तुझ्यावर

काही लिहूयात म्हंटले….

चारोळीत लिहायला घेतले पण,

चार पानांतही कमी पडले….💕💕

(ads1)

💕💕सांग सख्या , मी गेल्यावर

तुज माझी आठवण येईल का?

जाता जाता माझ्यासाठी तु,

दोन अश्रु गाळशील का?💕💕

💕💕सोबतीला असे आज ही सांज ओली

अवेळी आठवांचे धुके दाटलेली…

ऋतू जीवघेणे किती विसरावे..

पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली…💕💕

💕💕सांग हळूच कानात ,

येऊन सारे …

तुझ्याही मनात ,

काहीतरी आहे ..💕💕

💕💕स्वतःचं मन मारून

तुला बरं जगता आलं

आपल्यांशी देखील तुला

परक्यासारखं वागता आलं💕💕

प्रेमावर मराठी चारोळ्या

💕💕सुख दुखाचा विचार करताना

मी तुलाच समोर पाहिले

माझे संपूर्ण जीवनच

तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले💕💕

Charoli In Marathi On Love

Charoli In Marathi On Love
Charoli In Marathi On Love

💕💕सगळ्यात अनोळखी कोण आहे ?

तर मी आहे माझ्यासाठी

अन सगळ्यात जवळचा कोण आहे

तर मी आहे तुझ्यासाठी….💕💕

💕💕सहवासाची संगत तू

चांदण्यांची गंमत तू ,

रवि किरणांचा तुच तजेला

जलधारंची गंमत तू .💕💕

💕💕सखे कशी विसरशील तू

आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,

पारम्ब्यांच्या झुल्यावर

माझ्यासोबत झुललेल्या…..💕💕

(ads1)

💕💕ह्या पडणाऱ्या पावसात

तुझ्या सोबत भिजु वाटतं..

पण तु आजारी पडशील म्हणूनच

तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय…💕💕

💕💕 हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे…

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे…💕💕

💕💕 सर्वांपासून दूर एक

वेगळीच दुनिया आहे…

जिथे फ़क्त

तू आणि मी आहे…💕💕

💕💕हजार वेळा तुला पहावे

असेच काही तुझ्यात आहे

मिटुन ङोळे पुन्हा बघावे

असेच काही तुझ्यात आहे💕💕

💕💕शेवटचं आज जाताना ,

मागे वळून पाहणं नव्हतं…

तेव्हाच कळलं मला ,

सारंच आता संपलं होतं…💕💕

शांत असा मी कधीच नव्हतो..

प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!

असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..

नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?💕💕

💕💕हाताच्या ओंजळीतं खूप सारी

स्वप्ने रेखाटलेली आहेतं,

ती तुझ्या आणि माझ्यासाठी

नव्याने साकारलेली आहेत💕💕

💕💕होती लाही लाही झालेली तिची काया

आता रूप अन रंग हि उजळलेला

अशी पांघरली धरतीने हिरवाई

जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला💕💕

💕💕स्पर्श तो तुझा

हवा हवासा

श्वासातून भासे

नवा नवासा….💕💕

💕💕ही भेटच नाही तर फक्त

एक माझी आठवण आहे

हे फक्त शब्दच नव्हे, यात

विचारांची साठवण आहे💕💕

💕💕ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,

फुटले तर नाही ?

आयुष्याचे रंग ,

विटले तर नाही ?💕💕

(ads1)

💕💕हा पहाटेचा पाऊस अन

माझे डोळे मिटलेले

तुझे माझे क्षण ओवताना मनात

काही क्षण सुटलेले…💕💕

💕💕साथीला आता तु नाहीस,

हे ह्रदयाला कसं समजावु,

अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,

तु नसण्याचं शल्य कसं दाखवु….💕💕

💕💕शिकार करायला लागल्यावर

तू गळ घेऊन आलास…

पाण्यात खूप मासे होते

पण तू जलपरी मागे धावलास..💕💕

💕💕हे आपला अबोल प्रेम

असाच सुंदर असु दे

पण स्वप्नात का होईना

एकदा तरी खुलू दे💕💕

💕💕 हसत राहतो नेहमीच

मनातले दुःख लपवण्यासाठी…

सुखच मिळत नाही

तेवढं खरंखुर हसवण्यासाठी…💕💕

💕💕श्रावणसरीही मित्रा आता

परक्यासारख्या वागतात

ऊनपावसाच्या मतलबी खेळात

आपल्याच डोळ्यातून धावतात💕💕

💕💕स्वप्न मलाही पडतात, पण

त्यांच्या मागे मी धावत नाही

माझ्या आठ बाय दहाच्या खोलित

राजवाड्याचा दरवाजा मावत नाही💕💕

💕💕सये पाय दगडी नि दगडीच माथा

अशा देवळातून जाऊन येतो,

न देई कुणा घेतल्यावीण त्याला

नमस्कार नेमस्त देउन येतो.💕💕

💕💕ह्रदयातील माझी जागा तुझ्या

येण्याने भरुन गेली…

तू गेल्यावर ती जागा तुझ्या

आठवणींत बूडून राहीली…💕💕

💕💕सागराला वाटलं

थोडसं व्हाव शांत

का नदीने हि त्या

पाहावा एवढा अंत ?💕💕

💕💕 सरलंय आयुष्य माझ

तुझी वाट तशीच आहे,

गेलीस तू जीवनातून दूर

तुझी आस अशीच आहे💕💕

💕💕हे प्रेमाचं असचं असत..

थोडसं अवघड अन थोडं सोप असत..

पण एकदा जमायला लागलं की

ते आपोआपच घडत असतं..💕💕

(ads1)

💕💕 सरलेल्या आयुष्यात ही

थोड्या आठवणी आहेत,

सुखाचे क्षण जरी विसरले

त्या आठवणी सोबतीला आहेत💕💕

💕💕 सुखाची चटक लागली कि

मनाला दु:ख सोसवेनास होत.

आपल्या आभाळभर आकांक्षानी

आपलच दैव आपल्यावर उलटत💕💕

💕💕ह्रदयरुपी मंदिरात आई

तुझीच आहे मूर्ती …

त्यात तूच माझा देव,

आणि तुझीच गातो आरती…💕💕

💕💕हे सांगू की ते सांगू करत

तेच तर सांगायाच राहीले

तिचे ते मुके शब्द मी

माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले💕💕

💕💕सखे तू अशी नेहमी

वेड लावून का जातेस

डोळे मिटले कि तू

स्वप्नात येऊन जातेस..💕💕

💕💕सावली नकोस शोधु ,

ती आपल्या जवळच असते,

नजर फक्त मागे वळव,

डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,💕💕

💕💕हा खेळ प्राक्तनाचा

कधी कुणा न कळल़ा

कुणा मिळते सुख पांघराया

कुणी फ़क्त दु:ख ल्याला💕💕

Premachya Charolya

💕💕सये रोज नव्याने दरवळतो

तुझ्या आठवणीचा सुगंध

मग उगाचच जडतो जीवाला

तुला आठवायचा वेडा छंद💕💕

💕💕सत्ता हाती हवी म्हणून

तळवे चाटतात परकीयांचे

खोटी आश्वासाने देऊन देऊन

पैसे खातात स्वकियांचे💕💕

💕💕संपेल कधी हा दुरावा

होईन कधी एकरूप

एकदाच मज घेऊन कवेत

जाळून टाक तव तेजात💕💕

(ads1)

💕💕सांज वेळ येते रोजचं

रोजचं अशी ही वेगळी भासते…

सुर्य जातो पल्याड रोजचं

रोजचं मन ही उनाड भासते…💕💕

💕💕सगळचं बरोबर करताना

काही चुका करुन गेलो,

त्यात न विसरणाऱ्या व्यक्तीलाही

मी आज विसरुन गेलो..💕💕

💕💕स्पर्श तुझा व्हावा,

अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…

हक्काने मिठीत तू घ्यावेस,

जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…💕💕

💕💕हा नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला💕💕

हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..

तसा जीव सुटतो देहातून….

कोणी त्या क्षणांची वाट बघतं..

कोणी धास्ताऊन जात मनातून…💕💕

Marathi Charolya Prem Kavita

 

💕💕ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय

काहीच मागत नाही…

तू सोबत असताना माझे ह्रदय,

माझे राहत नाही…💕💕

💕💕शुन्यच आहे आयुष्य माझे

उणे तु असताना

धरलास का हात सांग तु

सोडुनच जायचे असताना…💕💕

💕💕ह्रदयात येऊन बघ अजून

त्याला तुझीच गरज आहे…

तू गेल्यानंतरही त्यात

तुलाच प्रेमाने जपत आहे…💕💕

💕💕

हृदय काहितरी सांगतय तुला,

वाट पाहते आहेस तु कोणाची तरी……

का लपवतेस भावना तुझ्या मनात,

हो कोणाच्यातरी मनाची रानी…💕💕

💕💕शांत संध्याकाळी समुद्रकिनारी

तुझी वाट बघत मी बसलो होतो

दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी

एकटाच बोलत बसलो होतो…

💕💕हताश नाही व्हायचं

प्रेमात धोका मिळाला तर,

जगायचं त्यांच्यासाठी ज्यांनी

जीव लावलायं आपल्यावर…💕💕

💕💕स्मृतींचे पारिजात बहरलं

जसं रोमरोमी डवरल…

स्मृती गंधात न्हाऊन

मनाच्या अंगणी बरसलं…💕💕

💕💕सहसा दाखवत नाही, मी कोणाला

माझा दुःखात बूडालेला चेहरा…

लोकं मात्र विचारत राहतात,

तू नेहमीच कसा रे हसरा?💕💕

💕💕 हसतेस इतकी सुंदर की,

तुझ्याकडे बघत बसतो…

आठवणीत मग तुझे ते

गोड हसणेच पाहत असतो…💕💕

💕💕हलकेच येऊन कानात ,

तुला सांगायचंय काही…

मिठीत तुझ्या येऊन ,

थोडं रहायचंय राणी…💕💕

(ads2)

💕💕होण्या फुलपाखरु सुरवंटाचे

नेहमीच सदभाव दाखविला…

पण ज्याने-त्याने स्वबुद्धिने

दुषणांचा मज़ डाग लाविला…💕💕

💕💕हस-या या चेह-यामागे,

खूपसं दुःख दडलेले…

काहींना ते हसणेही,

कधी ना पहावलेले…💕💕

 

💕💕हातात हात घेता तुझा,

हृदयात कंप उठले..

हळूच मन माझे

तुझ्यात गुरफटले….💕💕

💕💕सये मन माझं भरकटतं असे,

रंगबेरंगी फुलपाखरासारखं…

अन् शोधत प्रत्येक फुलात,

प्रितीचा गंध तुझ्यासारखं….💕💕

💕💕सांग या ह्रदयाचं

आता मी काय करू…

ठेवू स्वतःकडे की,

तुला देऊन जावू…💕💕

💕💕ह्रदय माझं हल्ली थोडं

वेड्यासारखं वागतं

तू ह्रदयात असतेस तरीही

बाहेर शोधायला लागतं💕💕

💕💕 हळूच दबक्या पावलांनी ,

तुझ्याकडे मी यायचं…

आणि तूला ते दरवेळी ,

आधीच कसं गं कळायचं ?💕💕

💕💕हरणे तर नसते कुणातही

असतो तो खेळ नियतिचा,

कधी सुखातं हसू तर कधी

दु:खातं मनाला रडवण्याचा.💕💕

💕💕ही कवितांची वही उघडा

पण जराशी जपून

नाहीतर चाहूल तुमची लागताच

शब्द बसतील लपून..💕💕

💕💕हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी

चोरून नेलंय….

स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे

ठेवून गेलंय….💕💕

💕💕सख्या रे काय सांगु तुला

जीव माझाच मजवरी उधार झाला

या वेड्या सखीने तर तो ही

मजपासुनी दुर नेला…💕💕

(ads2)

Marathi Charolya For Husband

💞💞मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय

तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं💞💞

💞💞तुझ्या कुकंवाशी माझं

नात

जन्मोजन्मी असावं

मंगळसूत्र गळ्यात

घालताना

तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली

तरी,

तुझा हात माझ्या हाती,

असावा,

आणि मृत्यूलाही जवळ

करताना,

देह तुझ्या मिठीत असावा💞💞

💞💞हजारो नाते असतील पण त्या,

हजार नात्यात

एक नाते असे असते

जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा

सोबत असतो तो म्हणजे ‘नवरा’💞💞

💞💞तुझ्या कवेत मला

माझे आयुष्य सारे काढायचे आहे

तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ

तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ💞💞

💞💞तुझ्या येण्याने माझे

आयुष्य झाले पुरे

तुझ्या येण्याने माझ्या

जगण्याला मिळाले अर्थ नवे💞💞

💞💞तुझ्या आठवणी म्हणजे

मोरपिसाचा हळुवार स्पर्श…

तुझ्या आठवणी म्हणजे

नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे

स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…

तुझ्या आठवणी म्हणजे

विरह सागरात हरवलेली नाव…💞💞

💞💞माझे आयुष्य, माझा सोबती

माझा श्वास, माझं स्वप्न

माझे प्रेम आणि माझा प्राण💞💞

💞💞तो बोलायला लागला की,

मी हरवून जाते,

त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच

लाजेने गुलाबी होते💞💞

💞💞तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी

आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी

नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला

कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा💞💞

Lagna Charolya

(ads1)

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन 

सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात 

नव्जीवनात केलेले पदार्पण 

सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन 

सासर -माहेरच्या नात्यांची 

मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण 

यासाठी हवा शुभ आशीर्वाद व 

शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण 

म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास 

आग्रहाचे निमंत्रणं !

Marathi Maitri Charolya

🧑‍🤝‍🧑आपली चूक कबुल करुन

मनात राग न धरता

परत पहिल्यासारखीच राहते

ती म्हणजे तुझी माझी मैत्री!🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑मैत्री असावी मनामनाची

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची

अशी मैत्री असावी

फक्त तुझी आणि माझी🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑बालपणातील मैत्री म्हणजे

एक खुणेची जागा

गाभुळलेल्या आठवणी विणणारा

एक नाजूक धागा!🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑मैत्रीचं नातं नाजूक

फुलासारखं अलगद फुलणारं

आणि

एकदा फुलून झालं की, जन्मभर

गंध देत झुलणारं!!🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण

आणि मनातून मिळालेलं खरखुरं

शहाणपण🧑‍🤝‍🧑

(ads1)

🧑‍🤝‍🧑किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस

दोन बोट जोडली की, दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची

मोठे होता होता सरलं सारं बालपण

मैत्री आपली अशीच राहील

आज, उद्या आणि कायम🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑चांगले मित्र आणि औषधे ही

आपल्या आयुष्यातील वेदना

दूर करण्याचे काम करतात

फरक इतकाच की, औषधांना

असते ‘एक्सपायरी डेट’

पण मैत्रीला नाही!!!🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले

पण बालपणातील त्या मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही

कारण ते दिवसच खास होते🧑‍🤝‍🧑

🧑‍🤝‍🧑अनोळखी अनोळखी म्हणत असताना

अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे

म्हणजे ‘मैत्री’🧑‍🤝‍🧑

सनी गणेश अमोल सागर

मित्र माझे केवढे

एक जण पक्त ज्युस पितो

बाकी पक्के बेवडे.

Also Read This Posts 

  • Miss You Status Marathi 😔

  • Attitude Status Marathi😎

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये marathi charolya on life, marathi charoli on life, birthday marathi kavita charolya, marathi prem kavita charolya, charoli marathi kavita, marathi charolya for husband, lagna charolya, marathi charolya on love, prem charoli, love charoli in marathi, lagna charolya marathi, marathi maitri charolya, premachya charolya, marathi prem charolya, charoli in marathi on love, marathi charolya kavita दिल्या आहेत. तुम्हाला या चारोळ्या कश्या वाटल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 

Leave a Comment

error: Content is protected !!