मराठी प्रेम कविता मैत्रीण, मित्र, नवरा, बायको साठी 💕 | Marathi Prem Kavita 💕 | Love Poem In Marathi 💞💕

या पोस्ट मध्ये internet वर उपलब्ध असलेले सुंदर सुंदर Marathi Prem Kavita या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही या कविता तुमच्या मित्र, मैत्रिण, नवरा, बायको ला साठी म्हणू शकता.

या मराठी प्रेम कविता तुमच्या प्रियव्यक्ती च्या वाढदिवशी व त्यांच्या खास दिवशी Whatsapp Status व त्यांना पाठवून आपल्या भावना व्यक्त करू शकता.

Table Of Contents(toc)

मराठी प्रेम कविता मैत्रीण, मित्र, नवरा, बायको (Marathi Prem Kavita)

💕💕

कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण

वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद

❤️❤️

(ads1)

❤️❤️तू खूप प्रेम करतेस म्हणून

तुझ्याशी भांडायला आवडते

भांडण झाल्यावर

तुझा रुसवा काढायला आवडते

तू जवळ नसल्यावर तुझी

आठवण काढायला आवडते

आणि तू जवळ असल्यावर

तुला चिडवायला आवडते

तुझ्यावर प्रेम करत नाही

हे भासवायला आवडते

आणि तू जवळ नसल्यावर

तुझ्या आठवणीत रडायला आवडते❤️❤️

❤️❤️बायको, बायको लाडाची बायको

कितीही बोललो तरी घेते कायम समजून

तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ

तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ❤️❤️

Also Read: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Prem Kavita

❤️❤️तुझी सोबत असताना,

जीवनात फक्त सुखांचीच,

अविरत बरसात असेल

प्रेम काय आहे माहीत नाही,

पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल

तर मला जन्मो जन्मी हवयं❤️❤️

❤️❤️चांदण्यात राहणारा मी नाही,

भीतींना पाहणारा मी नाही

तू असलीस नसलीस तरीही

शून्यात तुला विसरणारा मी नाही❤️❤️

(ads1)

❤️❤️भेट जाहली पहिली तेव्हा

सांज पेटली होती

रिमझिम वर्षेतूनि लालसा

लाल दाटली होती

काळ लोटला आज भेटता

नदी आटली होती

ओठांवरती उपचारांची

सभा थाटली होती- कुसुमाग्रज❤️❤️

❤️❤️

आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे

म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन

म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे

म्हणजे प्रेम❤️❤️

प्रीत..👨‍❤️‍💋‍👨

…..

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच

मी भुलत गेलो

तू सोडत होतीस केस मोकळे

मी मात्र गुंतत गेलो

…….

तुझ्या जादुई हसण्यातच

मी फसत गेलो

त्या मोहवणाऱ्या क्षणात

मी हरवत गेलो

…….

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही

मी बेभान होत गेलो

तो गंध माझ्या तन-मनात

नकळत साठवत गेलो

……

कळलं नाही हा श्वास

कधी झाला तुझा

इतकी प्रीत तुझ्यावर

मी कसा करत गेलो

(ads1)

Marathi Love Kavita

प्रिये…

….

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,

माझा श्वास तुच आहेस…

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

….

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..

डोळे लावुन भिजुन जा..

माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

नवरा बायको प्रेम कविता मराठी

❤️❤️तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे

गवत पात्यावर फुललेल्या

मोहक फुलासारखं

मोराच्या पिसाऱ्यावरील

वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं

समुद्रातील फेसाळलेल्या

उधाण लाटेसारखं

क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या

विखुरलेल्या उन्हासारखं

माळावर चांदण्याची

लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं❤️❤️

(ads1)

❤️❤️प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते

कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस

संसार म्हटला की, आल्या कुरबुरी

तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस

इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस

तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही❤️❤️

❤️❤️मी मागे नसतानाही,

असल्याचा भास होतो ना तुला!

लोकांशी महत्वाचं बोलतानाही

माझा जोक आठवतो ना तुला!

आपण गर्दीत चालतानाही,

माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!

इतरांसोबत जोरात हसतानाही,

माझा दुरावा रडवतो ना तुला!

कधी उदास वाटतानाही,

माझा चेहरा हसवतो ना तुला!

तुला नको असतानाही,

माझा आवाज लाजवतो ना तुला!

तू शब्दांनी नाकारतानाही

चेहराच सांगतो ना

मी आवडतो तुला!- विद्या भूतकर❤️❤️

(ads1)

Love Poems In Marathi

❤️❤️तुझ्या त्या

नजरेतील नजाकतीला

कसलीच तोड नाही

मला आता तुझ्याशिवाय

कसलीच ओढ नाही

तुझ्या निखळ मनात

अडकून राहायला होतं

तुझ्या निरागस हसण्यात

हरवून जायला होतं

तुझ्या आवाजातील बंदिश

जीव ओढून नेते

तुझ्या डोळ्यातील अश्रू

माझे प्राण घेते

या वेड्यांचे प्रेम फक्त

तुझ्यावरच असेल

तू प्रेम दे अथवा नको देऊस

पण साथ मात्र माझी नेहमी असेल❤️❤️

 

❤️❤️खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं

आज आहे उद्या नाही

असं त्यात कधीच नसतं

एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु

प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून

जात नसतं

कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं❤️❤️

❤️❤️प्रेम करणं सोपं नसतं…

सर्व करतात, म्हणून करायच नसतं..

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं…

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं…

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं…

कारण प्रेम करणं सोपं नसतं…

शाळा कॉलेजांत असच घडतं…

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं…

अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं…

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं…

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं…

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं…

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं…

कारण प्रेम करणं सोपं नसतं…

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं…

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं…

फोन कडे नेहमी लक्ष ठेवावं लागतं…

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं…

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं…

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं…

एवढ सगळं करणं खूप कठीण असतं…

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं,

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं❤️❤️

नवरा बायको प्रेम कविता संग्रह

वेड्या मनास माझ्या ..

…..

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही

वेड्या मनास माझ्या ………..

…..

बघता तुझी सावली जचली या मनाला

हरवून भान सारे मी शोधतो कुणाला

वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो

घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला

वेड्या मनास माझ्या …………

…..

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा

बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा

प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी

पाहू नकोस मागे समजून घे इशारा

वेड्या मनास माझ्या …

……

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला

प्रेमात खोट नाही विचार या नभाला

आलीस तू जीवनी होऊन आशा नवी

दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

…..

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

(ads1)

💞 प्रेम किनारा..💞

कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात….

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ….

साद घाली मना,

झोंबनारा गार हा वारा….

शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,

भावनाही उधाणलेल्या….

तयांशी लाभलेला तू…

प्रेम किनारा

❤️❤️सखे,

हातात हात घेशील तेव्हा

भिती तुला कशाचीचच नसेल

अंधारातील काजवा तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या,

आयुष्य म्हणजे,

नभात फुललेली चांदणरात असेल❤️❤️

तू आणि मी 👩‍❤️‍👩

पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,

माझ्या मनाचं पाखरू लागलं होत उडायला

बाकी कशाचाचं नव्हतं रे मला भान,

काय करु, तुझ्यावरुन हटतचं नव्हतं माझं

ध्यान

बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत

नव्हती,

कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती

गंमत वाटत होती मला चोरून पाहताना

तुझ्याकडे,

मन चिंब झालं होत,जेव्हा तू हसला होता

पाहून माझ्याकडे

आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास

होती,

कारण या भेटीनेच कदाचित पण आपली मनं

जुळली होती

माझ्या मनात फक्त तुला आणि तुलाच होती

जागा,

माहित नव्हतं तरिही काय होता आपल्याला

जोडणारा धागा

तुझ्याच विचारांत असायची मी नेहमीच दंग,

कारण तूच भरला होता ना माझ्या आयुष्याला

समजायला लागलं होतं आता मलाही थोडं

थोडं,

का झालं होत माझ मन तुझ्यात एवढं वेडं

गुंतला होता तुझ्यात जीव,माझं हृदयही

तुझ्याचसाठी धडधडत होतं,

आता मात्र हे वेडं मन,तुझ्याच सोबतीची स्वप्न

पाहत होतं

आणि तुझ्याच साठी जगात होतं ….

 

Prem Kavita Marathi Text

मराठी प्रेम कविता ❤️ | Marathi Prem Kavita 💕 | Love Poem In Marathi 💞💕

मैत्रीविना सारेच फिके .🤝

……

मैत्री कशी हळुवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दुःख वाहून जाते

व्यथांनाही हसू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे

फुलासारखे जपायचे

अन त्या सुगंधात

जीवन सुगंधी कराय

(ads1)

❤️❤️

गुलाबाचं फुल देणं

प्रेम असतं

पाकळीसमान तिला जपणं

प्रेम असतं,

तिला हसवणं म्हणजे

प्रेम नसतं

तिच्या सुखासाठी आपलं हसणं

प्रेम असतं,

तिला नेहमी सावरणं

प्रेम नसतं

सोबत राहून साथ तिची देणं

म्हणजे प्रेम असतं❤️❤️

❤️❤️तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते

बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस

प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा

तू नसशील तर आयुष्याची होईल दशा

कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर

सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा❤️❤️

❤️❤️आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता,

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो,

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती,

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं. – अभिजीत दाते.❤️❤️

❤️❤️

प्रेम कधी रुसण असतं,

डोळ्यांनीच हसणं असतं,

प्रेम कधी भांडतसुद्धा!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,

घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं- मंगेश पाडगावकर❤️❤️

❤️❤️कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात ,

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ,

साद घाली मना,

झोंबणारा हा गार वारा

शहारलेलं सर्वांग त्या लाटांपरी,

भावनाही उधाणलेल्या,

त्यावेळी लाभलेला तू

एक प्रेम किनारा!❤️❤️

(ads1)

Marathi Prem Kavita For Husband & Boyfriend 

मराठी प्रेम कविता ❤️ | Marathi Prem Kavita 💕 | Love Poem In Marathi 💞💕


❤️❤️तुझ्या कवेत मला

माझे आयुष्य सारे काढायचे आहे

तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ

तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ❤️❤️

❤️❤️तुझ्या आठवणी म्हणजे

मोरपिसाचा हळुवार स्पर्श…

तुझ्या आठवणी म्हणजे

नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे

स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…

तुझ्या आठवणी म्हणजे

विरह सागरात हरवलेली नाव❤️❤️

❤️❤️तो बोलायला लागला की,

मी हरवून जाते,

त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच

लाजेने गुलाबी होते❤️❤️

❤️❤️तुझ्या कुकंवाशी माझं

नात

जन्मोजन्मी असावं

मंगळसूत्र गळ्यात

घालताना

तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली

तरी,

तुझा हात माझ्या हाती,

असावा,

आणि मृत्यूलाही जवळ

करताना,

देह तुझ्या मिठीत असावा❤️❤️

❤️❤️हजारो नाते असतील पण त्या,

हजार नात्यात

एक नाते असे असते

जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा

सोबत असतो तो म्हणजे ‘नवरा❤️❤️

(ads1)

❤️❤️तुझ्यासाठी जीव देणारे

खूप जण भेटतील

पण माझ्यासारखा जीव लावणारी

कोणीही मिळणार नाही❤️❤️

❤️❤️मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय

तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं❤️❤️

❤️❤️तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी

आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी

नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला

कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा❤️❤️

❤️❤️तुझ्या येण्याने माझे

आयुष्य झाले पुरे

तुझ्या येण्याने माझ्या

जगण्याला मिळाले अर्थ नवे❤️❤️

❤️❤️माझे आयुष्य, माझा सोबती

माझा श्वास, माझं स्वप्न

माझे प्रेम आणि माझा प्राण❤️❤️

Also Read :

  • Wife Birthday Wishes In Marathi

निष्कर्ष

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita), kavita prem marathi, marathi love kavita, love poems in marathi, prem kavita marathi text दिले आहे.

तुम्हाला या marathi prem kavita कश्या वाटल्या नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा अश्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या www.rawneix.in या ब्लॉग का अधून मधून येत जा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!