101 वडील चारोळ्या | बाबांवर चारोळी | वडिलांवर कविता

 नमसकारम मी अभिषेक(Rawneix) तुमचे स्वागत आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या बाबांसाठी चारोळ्या शोधताय 😉 म्हणूनच आज च्या या नवीन पोस्ट मध्ये 😀 मी तुमच्या साठी घेऊन आलोय वडील चारोळ्या. 😀

तुम्ही वडील चारोळ्या शोधत या पोस्ट आलाच आहात तर आम्ही या पोस्ट मध्ये वडिलांवर कविता पण दिल्या आहेत नुसते बाबांवर चारोळी वाचू नका सुंदर सुंदर वडिलांवर कविता दिल्या आहेत त्या पण वाचा आणि हो जर तुम्ही ही पोस्ट Father’s Day दिवशी वाचत असाल तर मी फादर्स डे साठी पण चारोळ्या, कविता दिल्या आहेत.

Table Of Contents(toc)

वडील चारोळ्या/बाबांवर चारोळी

खिसा रिकमा असला जरी,

नाही कधी म्हणाले नाही,

माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत,

मी कुणी पाहिला नाही

ज्यांचं न दिसणार प्रेम

आम्हाला भरभरुन प्रेम देतं,

अशा माझ्या वडिलांना हॅप्पी फादर्स डे

 

बाबा अचानक निघून गेला..

खूप बोलायचं राहूनच गेलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं, 

बराच रागीट आणि तितकाच प्रेमळ बाबा, 

शिस्त लावणारा आणि मी लवकर घरी नाही आले तर काळजीने व्याकुळ होणारा,

लाडाने पिंट्या हाक मारणारा आणि मी चिडल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद आजही डोळ्यातून जात नाही,

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा,

तुमचा तो प्रत्येक गुण आणि दोष माझ्यात असल्याचा सार्थ अभिमान आहे,

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे,

माहीत आहे तुम्ही परत नाही येणार पण माझ्या प्रत्येक गोष्टीत बाबा नक्की असणार,

ज्यांना असतो बाबा कदाचित त्यांना पर्वा नसते, पण खरंच सांगते, बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो,

आजही लोकांच्या मुलांना बापाबद्दल बोलताना पाहून जीव गलबलतो,

वाटतं अजूनही अचानक डोक्यात टपली मारून माझी कळ नक्की काढेल बाबा,

ती माया, ते प्रेम, तो सहवास, मी दूर जाताना डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न कधी लपलाच नाही, 

माझ्यातून मी कधी तुम्हाला दूर होऊ दिलंच नाही, 

शेवटच्या क्षणीदेखील तुमचा हात घट्ट पकडला होता आणि अजूनही त्याच आधारावर आयुष्य काढायची ताकत तुम्ही दिलीत,

बाप नक्की कसा असावा तर तुमच्यासारखा… 

– दिपाली नाफडे

बाबांचा मला कळलेला अर्थ…

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर 

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,

स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण… 

डोळ्यात न दाखवताही जो

 आभाळा एवढं प्रेम करतो

 त्याला वडील नावाचा

 राजा माणूस बोलतात.

😊🙏

(ads1)

स्वत: टपरा मोबाईल वापरुन,

तुम्हाला स्टायलिश मोबाईल,

घेऊन देतो, तुमच्या प्रीपेडचे पैसै

स्वत: भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी

जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो, 

 माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

बाप चारोळी

वडील चारोळ्या

“बाप”

माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी 

स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर

आपले आईवडील

त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…

डोळ्यात न दाखवताही

जो आभाळाइतकं प्रेम करतो

त्याला वडील नावाचा

राजा माणून म्हणतात,  

बाप हाच देव ।मायेचा सागर ।

 प्रेमाचे आगर । माझ्यासाठी… ॥ 

पकडले बोट । तात माझा गुरू ।

 आयुष्य हे सुरू । बापामुळे… ॥

बाबांचे लाडाचे रुप म्हणजे मुलगी,

पण बाबा तुमच्या रुपाने मला मिळाला एक चांगला मित्र,

कोणी सोबत नसले तरी मला मिळावी तुमची साथ

बाबा म्हणून तुम्ही मला मिळावे जोपर्यंत असे आयुष्याची साथ

प्रत्येक वेळी खाली पडल्यावर

जो मला उचलतो, तो माझा बाबा,

चुका केल्यावर ओरडतो,

पण तरीही सावरुन घेतो, तो बाबा असतो,

 

(ads1)

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा

आपण भरारी मारत असू,

पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून

पहात असतील,

ते दोन डोळे म्हणजे आपले

आई-वडील..

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं 

तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे 

माझ पहिल प्रेम आई वडील

आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच

कमी झाल नाही..

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन

 आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही

 पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.

आई नाही म्हणते तेव्हा,

बाबा एकमेव हा म्हणायला असतो,

बाबा तुमची जागा मुलीच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही,

माहीत आहे ना तुम्हाला… मग तुम्ही मला फोन का करत नाही.

वडील चारोळ्या

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,

जी तुम्हाला जवळ घेते,

जेव्हा तुम्ही रडता,

तुम्हाला ओरडते,

जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,

तुमच्या यशाचा आनंद साजरा करते,

जेव्हा तुम्ही जिंकता,

आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,

जेव्हा तुम्ही हरता,

 

(ads1)

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर

तो कधीही स्तुती करीत नाही.

तो बढाई मारणारा कधीही नाही.

तो फक्त शांतपणे काम करतो

त्यांच्यासाठी त्याला सर्वात जास्त प्रेम आहे.

त्याची स्वप्ने क्वचितच बोलली जातात.

त्याची इच्छा खूपच कमी आहे,

आणि बहुतेक वेळा त्याची चिंता खूप बोलून जाईल.

तो तिथे आहे … एक भक्कम पाया

आमच्या सर्व जीवनातील वादळातून,

धरून ठेवण्यासाठी एक मजबूत हात तणाव

आणि कलहांच्या वेळी.

खरा मित्र आपण वळवू शकतो

जेव्हा काळ चांगला किंवा वाईट असतो.

आमच्या महान आशीर्वादांपैकी एक,

माणूस ज्याला आम्ही बाबा म्हणतो…

आई बाबा वरती माया 

अपार असायला पाहिजे

सागरासारखं प्रेम 

अपार असायला पाहिजे

श्रावण बाळाने केली जशी सेवा

तशी आपण पण करायला पाहिजे

खरा आनंद तर तेव्हा होईल

जेव्हा पैसे माझे असतील

आणि खरेदी माझे आईबाबा करतील..

बाबा तुमचा प्रत्येक शब्द,

माझ्या लक्षात आहे, बाबा

माझा प्रत्येक आनंद हा

तुमच्याशिवाय अपूर्ण आहे, 

ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,

त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,

कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,

कारण बाप असतोच जीवनाचा आधार,

  

(ads1)

आठवतं का बाबा सकाळी उठून तुम्ही मला पार्कात घेऊन जायचा,

माझ्यासोबत खेळता खेळता तुम्ही बाबाचे मित्र व्हायचा,

तोच मित्र मला हवा माझ्यासोबत कायम, लव्ह यू बाबा

आकाशालाही लाजवेल अशी उंची

आणि आभाळालाही लाजवेल असे,

कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’,

 

काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,

तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,

कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,

घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे

बापमाणूस,

तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज,  

बाबा, दणकट बाहू आहेत तुमचे,

सांगा कसा बरं खाली पडेन,

तुम्हीच माझा आधारवड,

शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन, 

बाप आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे,

कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाहीत,

 

बाबा हे अगदीच वेगळे रसायन असते,

त्याच्या ओरडण्याला काहीच सीमा नसते,

पण प्रेमाचा पूर आला तर मात्र प्रेमरसात बुडायला होते,

पितृ दिनाच्या शुभेच्छा!

बाबा घर तुमचे सोडून

कितीही दिवस झाले तरी,

तुमची आठवण आल्यावाचून राहात नाही,

बाबा तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.

वडील चारोळ्या

(ads1)

बाबा, तुम्ही आहात म्हणून

माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,

माझ्या यशाची चमक जेव्हा मला

तुमच्या डोळ्यात दिसते,

तेव्हा मी भरुन पावतो,

अशा माझ्या बापमाणसाला  

साथ मिळो जन्मभर नसे

 जीवा घोर व्याप आशीर्वाद 

डोईवरी पाठी शाबासकी थाप।

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?

घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड

आपल्या आई वडीलांना

आपल्या सोबत ठेवण्यासाठी

कधीच नाही भांडत…

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – happy fathers day 

 तुम्ही कितीही मोठे झाला तरीही 

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही 

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

तुम्ही मला सतत ओरडता असे मला आधी कायम वाटायचे,

पण आता कळते त्या ओरड्यामागे तुमचे प्रेम किती दडलेले होते,

मी ही होईन असाच चांगला बाबा

ज्यांचा नुसता खांद्यावर

हात जरी असला,

तरी समोरच्या संकटांना,

लढा देण्याची प्रेरणा मिळते,

अशा माझ्या बाबांना,  

जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा 

 फक्त बापपाठीशी असतो..

न हरता न थांबता प्रयत्न कर

बोलणारे आई वडीलच असतात 

कितीही हो ओरडता बाबा,

आता त्याची किंमत कळते,

तुमच्यामुळेच आज प्रगती झालेली दिसते,

कायम असेच राहा पाठीशी, मिळतो तुमचा आधार

 हिरो हे केवळ पडद्यावर नसतात 

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day 

आईसाठी खूप लिखाण केलं जातं 

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण 

आजचा दिवस आहे खास म्हणूनच 

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

कितीही अपयशी झाल्यावरही

विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो

तो म्हणजे बाबा

(ads1)

वडील म्हणजे अशी एक व्यक्ती

जी तुम्हाला जवळ घेते,

तुम्हाला ओरडते,

जेव्हा एखादी चूक तुम्ही करता,

तुमच्या यशाचा आनंद

साजरा करता,

आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते,

जेव्हा तुम्ही हरता,

 

 माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे 

कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

माझी स्तुती करुन कधीही न थांबणारी

व्यक्ती म्हणजे ‘बाबा’

बाबा म्हणून तुम्ही मला लाभलात हे आहे माझे भाग्य

तुमच्याशिवाय नाही माझ्या आयुष्याला अर्थ,

बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा खरा अर्थ

आपले दु:ख मनात लपवून,

संपूर्ण परिवाराची काळजी करणारा,

काही कमी नको पडायला म्हणून

स्वत:च्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणारा,

असतो तो बापमाणूस,  

 बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे 

 मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

कोडकौतुक वेळप्रसंगी,

धाकात ठेवी बाबा,

शांत प्रेमळ कठोर,

रागीट बहुरुपी बाबा, 

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते

ती “आई”…

आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात

ते “बाबा”..

शोधून मिळत नाही पुण्य,

सेवार्थाने व्हावे लागते धन्य,

कोण आहे तुझविणं अन्य?

‘बाबा’

तुजविण माझं जग आहे शून्य,  

देव देवळात नाही,

तो माझ्या बाबांमध्ये आहे,

अशा माझ्या लाडक्या बाबांना

बाबांवर कविता (Marathi Kavita On Baba)

माझे बाबा आहेत प्रेमाचा एक अतूट झरा,

कधी रागावतात कधी चिडतात पण जवळही घेतात,

माझे बाबा आहेत एक सावली,

सतत सोबत चालणारी भासली नाही तरीही

आजुबाजूला जाणवणारी,हॅपी फादर्स डे!

तो कधीही स्तुती करत नाही,

तो बढाई मारणारा नाही,

माझा बाप मला नको ती स्वप्न

दाखत नाही,

तो म्हणतो मेहनत कर

आणि खा कष्टाची भाकर

मगच तुला कळेल बाप होणं काय असतं,हॅपी फादर्स डे!

न बोलता प्रेम करतो,

न सांगता आधार देतो,

न थकता कष्ट करतो,

न दाखवता सहन करतो,

तो फक्त माझा बाप असतो, हॅपी फादर्स

(ads1)

आम्ही आयुष्यभर सावली

राहावे म्हणून स्वत: आयुष्यभर,

उन्हात झिजला

कधी स्वत: उपाशी राहून,

आम्हाला अन्नाचा घास भरवला,

अशा आमच्या वात्सल्य मूर्तीला, हॅपी फादर्स डे!

जग दाखवलं तुम्ही,

खेळायला शिकवलं तुम्ही,

हातात हात घेऊन चालायला

शिकवलं तुम्ही,

लहानपणी धाक दिला तुम्ही,

पण प्रसंगी प्रेमाचा हातही फिरवला तुम्ही

अशा माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे!

☀️सूर्याप्रमाणे तळपनाऱ्या

जीवनाच्या वाटेवर

मायेची सावली तुम्ही …

जीवनातील दु:खरूपी..

युद्ध व माझ्यातील…

ढाल बनता तुम्ही…

देव म्हनावे तरी कसे, तुम्हाला 

तुम्ही तर त्याहुनी

श्रेष्ठ माझ्यासाठी…

देव देतो सुख दुःख दोन्ही …

पण तुम्ही ..

सुखाने आयुष्य भरले माझे तुम्ही….

पूर्व जन्माची पुण्याई माझी ..

लाभले पिता म्हणुनी तुम्ही…

हीच धन्यता माझी….

                  – ADITYA SHAM ZINAGE

  

या पोस्ट्स पण वाचा तुम्हाला नक्की आवडतील 😊 :

निष्कर्ष

मग कश्या वाटल्या वडील चारोळ्या, बाबांवर कविता मी मी माझे 100% दिले आहेत या पोस्ट मध्ये जितके जास्त होईल तितके या पोस्ट मध्ये मराठी चारोळ्या देणाचा प्रयत्न केला आहे आणि हो या पोस्ट ला मित्रांसोबत आणि ☺️ खास मैत्रीण व खास मित्रा सोबत तर नक्की शेअर करा . आणि अश्या आणखी पोस्ट्स साठी येत जा अधून मधून www.rawneix.in वर आमचा ब्लॉग तुमच्या साठी 24 तास खुला आहे. तुम्ही facebook वर असाल तर माझ्या facebook page ला Like करायला विसरू नका. मग भेटू दुसऱ्या अश्याच आणखी नवीन पोस्ट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!