सारांश लेखन | Saransh Lekhan In Marathi 9th, 10th, 12th Class नमुने, उतारे, PDF

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या पोस्ट मध्ये मराठी उपयोजित लेखन मधील 10 वीच्या परीक्षेत विचारले जाणारे सारांश लेखन बद्दल संपूर्ण माहिती आणि उतारे आणि त्यांची उत्तरे या पोस्ट मध्ये देणार आहे.

परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.

मित्रानो तुम्हाला प्रत्येक नमुन्याचे pdf देणार आहोत जनेकरून तुम्ही प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवू शकता आणि सोबतच तुम्हाला Saransh Lekhan म्हणजे काय?, सारांश लेखन कसे करावे? (how to write saransh lekhan in marathi) हे ही सांगणार आहे. अंशात्मक सार म्हणजे सारांश लेखन होय

(ads2)

Table Of Contents(toc)

सारांश लेखन (Saransh Lekhan In Marathi)

saransh lekhan in marathi

Saransh Lekhan ही कला आहे ही एक भाषिक कौशल्यातील कला आहे. लेखकांचे विचार आपल्या भाषेत संक्षेपात लिहून दाखवणे. 

तात्पर्य सांगायचे झाल्यास एका वाक्यतही सांगता येईल त्या कलाकृतीचा संक्षेप करताना त्यातील अनावश्यक विस्तार टाळून तिची थोडक्यात पूर्णगुंफन केली तो संक्षेप होऊ शकेल किंवा त्या कलाकृतीतील मध्यवर्ती कल्पना फुलवून आपल्या शब्दात मांडली की तिचा अश्या व्यक्त होऊ शकेल परंतु सारांश लेखन मात्र वरील तिनीही प्रकाराने होऊ शकणार नाही.

Saransh Lekhan म्हणजे काय?

सारांश लेखन म्हणजे: मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करणे होय.

सारांश लेखनासाठी त्या कलाकृतीतील प्रमुख कल्पना किंवा विचाराशी संबंधित आशा मुद्यांचे थोडक्यात पण स्पष्ट रीतीने केलेले सार संकलन म्हणजेच सारांश लेखन (Saransh Lekhan) होय.

(ads2)

सारांश लेखन कसे करावे? (How To Write Saransh Lekhan In Marathi)

सारांश लेखन इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचे आहे?

परीक्षेत सारांश लेखनाला 6 गुण दिले जातात जर तुम्हाला पत्र लेखन येत नसेल तर तुम्ही सारांश लेखन करू शकता कारण इयत्ता दहावीच्या परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.

सारांश लेखन करण्यासाठी तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही कारण तुम्हाला प्रश्नपत्रिकेत उतारा दिलेला असतो तो उतारा वाचून तुम्हाला त्या उताऱ्याच्या मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करायचे असते.

(ads2)

Also Read: Barley In Marathi

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

(ads1)

सारांश लेखन नमुना उतारा: १

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

रागावर विजय मिळवायचा तर आधी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. माणुसपणाने वागता यायला पाहिजे. मला मदत हवी असेल तर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. मी परिपूर्ण नाही तर इतर ही नाहीत. माझ्या चुका होतात तश्या त्यांच्याही होतात.माझ्या मना विरुद्ध गोष्टीशी जुळवून घेता आले पाहिजे तेवढा लवचिकपणा माझ्याकडे हवा रागही इतकी नाकारत्मक भावना आहे की ती ज्याचा राग आला आहे. त्याच्याशीच रागाच्या विचाराने सतत बांधून ठेवते.क्षमा करायला शिकलो की हे रागाचे विचार नाहीसे होतात. रागामुळे पडणारी मानसिक बंधणेच तुटून जातात. मनाचा उदारपणा ही राग येणे कमी करतो. रागाचे प्रकटीकरण जितके सौम्य पणे करता येईल तेवढे करावे. नाहीतर आपला राग जातो पण रागाच्या भरात बोललेले शब्द आणि केलेली कृती परस्पर नातेसंबंध दुबळे करू शकतात.

(ads2)

नमुना उतारा १ चे सारांश लेखन

अहंकारामुळे रंगाची निर्मिती होते त्यासाठी अहंकाराचा त्याग करत दुसऱ्याच आदर करायला शिकावे. एकमेकांचा आदर करावा या जगात कोणीही परिपूर्ण नाही याचा विचार करावा. आपण क्षमाशील असणे महत्त्वाचे आहे. क्षमाशील झाल्यावर रागावर विजय मिळवता येतो रागामुळे परस्पर नातेसंबंध हे दुरावत असतात. त्यासाठी सहकार्यांची भावना मनात ठेवली पाहिजे.

सारांश लेखन नमुना उतारा: १ Pdf Preview

Download Pdf(download)

सारांश लेखन नमुना उतारा: २ 

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

गुरुजींचीश्यामची आई म्हणजे कुमारची जणू गीताच आहे. पण ज्याला साने गुरुजी म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे त्याने श्यामची आई पुन्हा-पुन्हा वाचली पाहिजे. पारायणे केली पाहिजेत. प्रत्येक माताच प्रेममयी असते व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागे पुढे पाहणार नाही हे खरं. गुरुजींची आई एक विलक्षण स्रीरत्न असले पाहिजे. आभाळ फाटावे तसा त्या माऊलीचा संसार तुटत चालत होता पण ती जीवाचे रान करून तो सावरू पाहत होती. घरात खायची अडचण वस्त्रांची टंचाई पोराबळांच्या शिक्षणाला दमडी नाही पण श्यामची आई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या मनात सुंदर वळण लावण्यासाठी आमरण झिजली साने गुरुजींच्या जवळ जे-जे काही सुंदर होते देण्यासारखे होते ते-ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यवरच न्हवे तर गाई गुरांवर फुलपाखरावर झाडा माडावर प्रेम कोणीही गोड कौतुक करील पण दुसऱ्यांच्या मुलांचेही तितक्यात प्रेमाने करावे. हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने रागाने तिच्या अश्रूंनी गुरुजींच्या मनपिंड बाळसेदार झाला.

(ads2)

नमुना उतारा २ चे सारांश लेखन

आई म्हणजे जननी असते . ती कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही. आई ही एक अमूल्य रत्न आहे. गुरुजींची ही आई तशीच होती सर्व दुःखांवर अडचणींवर मात करत आपल्या मुलंबाळावर चांगले संस्कार करण्यासाठी झगडत होती. तिने आपल्या मुलांसोबत दुसऱ्याचेही गोड कौतुक करायची.

सारांश लेखन नमुना उतारा: २ Pdf Preview 

Download PDF(download)

सारांश लेखन नमुना उतारा: ३ 

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

मैत्री मध्ये सहवासाला काही महत्व असतेच. जुन्या लोनच्यासारखी जुनी मैत्री मुरत जाते एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रिणी समोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे, निर्भयपणे आपण तिथे प्रकट होतो. या सध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्त्रेय लाभते. भोवताली पसव्या अस्थिर धूर्त मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहज स्थाने म्हणजे आपला एक मोन आधार असतो. तिथे पायाखाली जमीनच असते जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तो टणक खडबडीत जमीन लागावी असे या मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच.

(ads1)

नमुना उतारा ३ चे Saransh Lekhan

सर्वांच्या आयुष्यात मित्र किंवा मैत्रीण हवीच असते. मैत्री ही अशी भावना आहे असा संबंध आहे की त्यामुळे आपल्याला स्थैर्य लाभते. या जगात जगण्यासाठी मैत्री हा खूप मोठा आधार आहे. प्रत्येक संकटात किंवा सुखा दुःखात मित्र आपल्याला सोबत असतात. आपण मित्रासमोर निखळपणे निर्भयाने बागडत असतो. यातूनच मैत्री एक घट्ट वीण बनते.

सारांश लेखन नमुना उतारा: ३ PDF Preview

Download PDF(download)

निष्कर्ष

मी तुम्हाला Saransh Lekhan In Marathi या पोस्ट मध्ये Saransh Lekhan म्हणजे काय?, सारांश लेखन कसे करावे? (how to write saransh lekhan in marathi) आणि काही उतारे आणि त्यांचे उत्तरे दिली आहेत आणि त्यांचे PDF ही दिले आहेत. 

आणखी अश्या मराठी उपयोजित लेखन, marathi grammar आणि शैक्षणिक माहिती साठी आमच्या ब्लॉग ला बुकमार्कमध्ये ठेवा आणि ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!