धनत्रयोदशी पुजा विधी आणि संपूर्ण माहिती | Dhantrayodashi Puja Vidhi, Information In Marathi

Rate this post

तुम्हाला माहित आहे का धनत्रयोदशी का साजरी केली जाते? आणि याचे काय महत्त्व आहे? माहीत नसेल तर आम्ही या पोस्ट मध्ये dhantrayodashi information in marathi मध्ये देणार आहोत.सोबतच या पोस्ट मध्ये dhantrayodashi puja vidhi in marathi पण देणार आहोत. 

मंडळी धनत्रयोदशी रोजी असे काय करावे? ज्याने घरात सुख समृद्धी येईल, पूजा कशी करावी? आणि कथा यांची सम्पूर्ण माहिती आम्ही खाली दिली आहे.

Table Of Contents(toc)

धनत्रयोदशीची माहिती (Dhantrayodashi Information In Marathi)

धनत्रयोदशी ला धनतेरस असे ही म्हंटले जाते कारण धन म्हणजे पैसे आणि तेरस म्हणजे तेरा (१३) म्हणजेच धनाला तेरा गुणाने वाढवणे.

दिवाळीच्या दोन दिवस अगोदर देव वैद्य धनवन्तरी यांची पूजा केली जाते कारण समुद्र मंथनाच्या वेळी याच दिवशी भगवान विष्णू चे अंश असलेले भगवान धनवन्तरी हे हातात अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झाले होते आणि त्यांनी सर्व देवांना अमृत पाजवून अमर केले होते. या दिवसाला भगवान धनवन्तरी यांची जयंती सुद्धा म्हंटले जाते.

या दिवशी दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावे म्हणून भगवान धनवन्तरी यांची पुजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी व्यापारी लोक हिशोबाच्या नवीन वह्यांची पूजा करतात आणि त्यांना वापरण्यास सुरुवात करतात. शेतकऱ्यांच्या अजीविकेचे साधन हे पशु असल्यामुळे ते पशूंची पूजा करतात.

Also Read: Dhantrayodashi Wishes In Marathi

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त

2021 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे? २ नोव्हेंबर
धनत्रयोदशी दिवशी काय केले जाते? सोने चांदी व भांडे आणि पूजा केली जाते
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त 18:28 ते 20:04 पर्यत
वेळ 1 तास 36 मिनट पर्यंत
प्रसाद काल 17:43 ते 20:04 पर्यंत
वृषभ काल 18:28 ते 20:37 पर्यंत

Also Read: Bhaubeej Wishes In Marathi

धनत्रयोदशी पूजा विधी (Dhantrayodashi Puja Vidhi In Marathi)

सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि भगवान धनवन्तरी यांची मूर्ती व प्रतिमा एका पवित्र ठिकाणी स्थापन करावी. स्वतःचे मुख पुर्व दिशेला करून बसावे.

आणि खाली दिलेले भगवान धनवन्तरीच्या मंत्राचे समरण करून आवाहन करावे.

सत्यं च येन निरतं रोगं विधूतं,

अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।

गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।

त्यानंतर आचमन करून भगवान धनवन्तरी च्या प्रतिमेवर गधं फुल, अक्षता, गुलाल अर्पण करावे. चांदीच्या भांड्यात खिरीचे नैवेद्य दाखवावे ( चांदीचे भांडे उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही भांड्यात नैवेद्य दाखवू शकता) पुन्हा आचमन करावे.

मुख शुद्धीसाठी विड्याच्या पानाचा एक विडा लावून ठेवावे आणि तुळस, शंखपुष्पी, ब्राह्मी इ. पूजनीय औषधी भगवान धन्वंतरीला अर्पण करावे.

रोग नाशच्या इच्छेने खाली दिलेल्या मंत्राचे स्मरण करावे.

ऊं रं रूद्र रोग नाशाय धन्वन्तर्ये फट्।।

मंत्राचे समरण केल्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ अर्पण करून आरती करावी.

भगवान धनवन्तरी आरती

जय धन्वंतरि देवा, जय धन्वंतरि जी देवा।

जरा-रोग से पीड़ित, जन-जन सुख देवा।।जय धन्वं.।।

तुम समुद्र से निकले, अमृत कलश लिए।

देवासुर के संकट आकर दूर किए।।जय धन्वं.।।

आयुर्वेद बनाया, जग में फैलाया।

सदा स्वस्थ रहने का, साधन बतलाया।।जय धन्वं.।।

धनवन्तरी आरोग्य मंत्र

”ऊं नमो भगवते महा सुदर्शनाया वासुदेवाय धन्वन्तरये अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्य पतये त्रैलोक्य निधये श्री महा विष्णु स्वरुप श्री धन्वंतरि स्वरुप श्री श्री श्री औषध चक्र नारायणाय स्वाहा।”

धनत्रयोदशी कथा

भविष्यवाणी प्रमाणे हेमराजाचा पुत्र त्याच्या सोळाव्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असतो. राजा आणि राणी आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे म्हणून ते त्याचे लग्न करतात.

लग्नानंतर चौथ्या दिवशी राजकुमार मृत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. राजकुमाराची पत्नी त्याला रात्री झोपू देत नाही ती त्या रात्री राजकुमाराच्या अवतीभवती सोने-चांदीच्या मोहरा ठेवते.

आणि महालाचे प्रवेशद्वार हे सोन्याचांदीच्या मोहरांनी रोखले जाते आणि मोठमोठ्या दिव्यांनी सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो.

राजकुमाराची पत्नी त्याला गाणी, गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यमदेव सापाचे रूप घेऊन राजकुमाराच्या कक्षात येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे डोळे सोन्याचांदीने लपलपतात आणि त्यांना राजकुमार दिसत नसल्या कारणाने ते यमलोकत परततात. आणि अश्या प्रकारे राजकुमाराच्या पत्नीने राजकुमाराचे जीव वाचवले. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे ही म्हणतात.

धनत्रयोदशी दिवशी काय करावे?

  • धनत्रयोदशी दिवशी आपल्या आयप्ती प्रमाणे सोने चांदीचे आभूषणे, तांबे, पितळ चे भांडे गरहुपघेणे शुभ मानले जाते. या दिवशी जमीन आणि गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.
  • भगवान धनवन्तरी यांची पूजा करावी.
  • सायंकाळी दिवा लावून घर व दुकानाची पूजा करावी.
  • प्रदोष काळात चवगोशाळा, मंदिर, तलाव, विहीर, बागेत तीन दिवस दिवा लावावा.
  • नविन झाडू किंवा सूप घेऊन त्याची पूजा करावी.

यम दीपदान

संध्याकाळी तिळाच्या तेलाने भरलेला दिवा एका पात्रात लावावा.

पुन्हा गधं पुष्प आणि अक्षतानी पूजा करा. आणि दक्षिणेकडे तोंड करून यमदेवतासाठी खालील मंत्र म्हणा.

मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।

सर्व दिवे कोठेही ठेवा आणि त्यातील एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड पेटत ठेवा. त्याने यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमदेवतांची पूजा

यम देवासाठी एक पिठाचा दिवा बनवा आणि तो घराच्या उंबरठ्यावर ठेऊन घरातील स्त्रियांनी तेल टाकून त्यात चार वाती लावून पाणी गुळ, फूल, पोळी, तांदूळ नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करावी.

निष्कर्ष

dhantrayodashi in marathi या पोस्ट मध्ये आम्ही dhantrayodashi information in marathi, dhantrayodashi puja vidhi in marathi, धनवन्तरी आरोग्य मंत्र आणि धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती दिली आहे.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या सोबत facebook, whatsapp द्वारे नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!