गजानन महाराज यांचे सुविचार, Quotes, Status | Gajanan Maharaj Quotes In Marathi

जय श्री गजानन महाराज 🙏 आपले www.rawneix.in या ब्लॉगवर आजच्या marathi quotes या category मधील आमची नवीन पोस्ट gajanan maharaj quotes in marathi मध्ये आपले स्वागत आहे.

या पोस्ट मध्ये तुम्हाला श्री गजानन महाराज यांचे विचार, status, quotes, images जे तुम्ही तुमच्या whatsapp status ला facebook story आणि instagram story ला ठेऊन माऊलींचे विचार लोकांपर्यंत पोहचवू शकता.

खाली आम्ही shri gajanan maharaj यांचे विचार, quotes, status आणि सोबतच त्यांच्या प्रगट दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

चला तर पाहूया gajanan maharaj quotes in marathi 😀

हे पण पहा: Swami Samarth Quotes In Marathi

Table Of Contents(toc)

Gajanan Maharaj Quotes In Marathi 

*झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली*

*नाम घेतो तुझे गजानन माऊली*

*वरदहस्त लाभो तुझा सकलासी…*

*सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी..*

*॥ॐगण गण गणांत बोते॥*

 

।।🌺जय गाजनन🌺।।

माझे चित्त माझे मन।

बोले जय गजानन।।

जीवनातील प्रत्येक क्षण।

गजाननाला अर्पण।।

कणांपासून सृष्टी बनली।

त्यातील मी एक क्षुल्लक कण।।

मात्र प्रत्येक कणात आहे।

माझा गजानन।।

भक्त मी गजाननाचा।

गुरुवार माझा सण।

गुरुवारी कामे मार्गी लागती।

कठीण असुदे कितीपण

गजानन महाराज सुविचार

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।

न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

 

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।

आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् । पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।

श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

Gajanan Maharaj Status

॥ अनंत कोटी ॥

॥ ब्रह्मांड नायक ॥

॥ महाराजाधिराज ॥

॥ योगीराज ॥

॥ परब्रम्ह॥

॥ सच्चीदानंद ॥

॥ भक्तप्रतिपालक ॥

॥ शेगावनिवासी ॥

॥ समर्थ सदगुरू ॥

॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥

!! गण गण गणात बोते !!

!! जय गजानन माउली !!

गजाननच संपूर्ण ब्रह्मांड

तर आपण एक क्षुल्लक कण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन ।।

गजाननाच्या भक्तीत

उपयोगी नाही धन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ

तर फक्त कर तू श्रवण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

जीवनातील त्रास थोडे

कर तू सहन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

गजानन आपुले गुरू

आणि गुरुवार आपला सण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

🌺जय गजानन माऊली🌺

गजानन महाराज स्टेटस फोटो 

जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया ।

।। जयदेव जयदेव ।।धृ।।

संकटातून तारत असे।

विघ्ने दूर सारत असे।।

शेगाविचा गजानन भक्तांवर।

नेहमीच माया करत असे।।

।। जय गजानन माऊली ।।

सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।।

उपेक्षूं नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेची आता ।।१।।

उपासनेला दृढ चालवावे । भूदेव-संतासि सदा नमावे ।

सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।

तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

गजानन महाराज फोटो शुभ सकाळ

चुको न माझा मार्ग खरा ।

दुखो न कुणाचे मन जरा ।।

वाहू दे सुखाचा झरा ।

गजानना कृपा करा ।।

🙏जय गजानन माऊली🙏

Gajanan Maharaj Quotes In Marathi

ज्याचे नाम सदैव ओठी।

त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी।।🙏

|| गजानन महाराज की जय ||

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे । त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।

मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।

शेगाव गावी वसले गजानन,

स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न..

म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला,

नमस्कार माझा श्री गजाननाला..

करण्या दृष्टांचा अंत ।

शेगावी अवतरले संत ।।

संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा

गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।

वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।

यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।

येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष।

Gajanan Maharaj Quotes In Marathi

करतो मी स्पष्ट।

नाही मी गर्विष्ठ।।

फक्त झुकतो गजानापुढे।

तेच माझ्यासाठी श्रेष्ठ।।

🙏जय गजानन माऊली🙏

कोण हा कोठीचा काहीच कळेना।

ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती।

आलीसे प्रचिती बहुतांना॥

॥ गण गण गणांत बोते ॥

व्याधी वारून केलें कैका संपन्न ।

करविले भक्तालागी विठ्ठल-दर्शन ।

भवqसधु हा तरण्या नौका तव चरण ।

स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन ।

।।जयदेव जयदेव ।।४।।

आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे,

दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन..

पुण्य लाभे सात जन्मीचे,

गजानन चरण स्पर्शून..

गण गण गणात बोते..

जय गजानन..!

गजानन महाराज स्टेटस मराठी

 

करुनी शेगावची वारी

मन रमु दे या संसारी

राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास

तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास ।।

येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी,

आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी ।।

मोठा होता होता कधी तुझा दास झालो हे कळले नाही,

आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही ।।

घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची,

नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची ।।

भक्त संकटी पडता न बोलवताही तू धावत येसी,

गण गण गणात बोते बोलुनी भक्ता भवपार तारून नेसी ।।

वंदुनिया तुजला सकळ जन्म हा सार्थकी झाला,

आपल्या भक्तांच्या भेटीसाठी गजानन स्वर्गातून खाली आला ।।

💐जय गजानन श्री गजानन💐

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।

स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।

तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।

लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।

।। जयदेव जयदेव ।।१।।

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।

करूनी गणि गण गणांत बोते या भजना ।

धाता हरिहर गुरूवर तूंचि सुखसदना ।

जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ।

।। जयदेव जयदेव ।।२।।

लीला अनंत केल्या बंकट सदनास ।

पेटविले त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।

क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।

।। जयदेव जयदेव ।।३।।

निष्कर्ष

मंडळी वर दिलेले सर्व gajanan maharaj quotes in marathi तुम्हाला आवडले असतील अशी आशा आहे. आम्ही या पोस्ट मध्ये महाराजांचे विचार, quotes जितके आम्हाला internet social media वर मिळतील ते या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही ही पोस्ट मित्र, नातेवाईक यांना whatsapp, facebook , instagram आणि इतर social media द्वारे शेअर करून महाराजांचे विचार पोहचवा. जय श्री गजानन महाराज जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!