कुळीथ म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

1/5 - (1 vote)

Horse gram in Marathi: कुळीथ म्हणजेच हुलगे आणि इंग्रजी मध्ये या डाळीला horse gram (हॉर्स ग्रॅम) असे म्हटले जाते. कुळीथ डाळीला चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजले जाते म्हणून Horse gram in Marathi या लेखात कुळीथ डाळ म्हणजे काय, त्याचे फायदे व दुष्परिणाम आणि कुळीथ डाळचा वापर कसा करतात हे दिले आहे.

चला तर पाहूया कुळीथचे आरोग्यासाठी फायदे व नुकसान आणि त्याची संपूर्ण माहिती.😊

Table Of Contents(toc)

कुळीथ म्हणजे काय? (Horse Gram In Marathi)

कुळीथ डाळीस हुलगे असेही म्हटले जाते. कुळीथ डाळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सामान्यत: कुळीथ हे घोड्याचे आहार म्हणून वापरले जाते. कुळीथ पचायला हलके असते आणि त्याची चव गोड तुरट असून उष्ण असते. 

कुळीथचे फायदे – हुलगे खाण्याचे फायदे (Benefits of Horse gram In Marathi)

कुळीथ डाळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कुळीथ डाळीचे आहारात समावेश केल्यास आरोग्यावर कोणता परिणाम होतो हे खालील प्रमाणे दिले आहे. 

वजन कमी करण्यासाठी

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

कुळीथ हे लठ्ठ व्यक्तिसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारात कुळीथाचे समाविष्ट करा कारण इतर कडधान्याच्या तुलनेत कुळीथ मध्ये सर्वात कमी चरबी आहे. आणि कुळीथ मध्ये फायबर चे प्रमाण अधिक असल्याने पचन योग्य प्रमाणात होते.

कुळीथच्या सेवन मूळे सतत भूक लागत नाही. कुळीथ तुमच्या शरीरातील फॅट्सवर बर्निंग अजेंट प्रमाणे काम करते. जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर तुम्ही आपल्या आहारात कुळीथ चा नक्कीच समाविष्ट करा.

मधुमेह 

मधुमेह हा आजार आपल्या खान-पान मध्ये सुधारणा केल्यास नियंत्रित केला जाऊ शकतो. कुळीथ मध्ये अँटी ऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे मधुमेहातील धोके कमी होण्यास मदत मिळते. कुळीथ डाळीचा आहारात उपयोग केल्याने रक्तातील साखर कमी प्रमाणात वाढते.

त्वचा

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

कुळीथ डाळीचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण कुळीथ त्वचेसाठी सुध्दा फायदेशीर आहे. बेसन प्रमाणे कुळीथचे पीठ फेसपॅक सारखे लावू शकता. कुळीथचे पीठा मूळे फोडे, डाग, व्रण, चट्टे, एक्ने कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे कुळीथ मध्ये फ्लेव्होनॉइड्स असते त्यामुळे सुर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. 

ह्रदय 

कुळीथ मध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व आहेत जे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात त्याच प्रमाणे कुळीथ आहारात समाविष्ट केल्याने ह्रदय स्वस्थ राहते.

मुतखडा

कुळीथ हे मुतखड्याच्या उपचारासाठी देखील वापरले जाते. शरीरात कॅल्शिअम फॉस्फरेट मिठाचे खडे तयार झाल्याने मूत्रपिंडाचे त्रास जाणवू लागते. कुळीथ मध्ये अँटी ऑक्सिडंट आसतात ज्यामुळे कुळीथ खाल्याने शरीराला पुरेसे अँटी ऑक्सिडंट मिळतात. त्यामूळे मुतखड्याची निर्मिती रोखली जाते. कुळीथ मुळे लघवीचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मूत्रमार्गाद्वारे मूत्रपिंडातील दगड निघून जाते.

ताप आणि सर्दी

सर्दी आणि ताप या सारख्या आजारासाठी पूर्वीपासून कुळीथ डाळीचा उपयोग केला जातो. कुळीथ मध्ये उष्णता असते त्यामुळे सर्दी, खोकल्यावर कुळीथ डाळीचे काढा परिणामी ठरतो. तसेच गळ्यातील संक्रमण कमी करण्यास मदत करते. कुळीथ डाळीचे पाणी हे सर्दी आणि ताप वर एक उत्तम औषध आहे. आणि कुळीथ डाळीच्या पाणी मुळे इन्फेक्शन देखील वाढत नाही.

दमा नियंत्रित ठेवण्यासाठी

दमा अथवा अस्थमा असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवून दमा चा त्रास आटोक्यात आणण शक्य आहे. सर्दी, धूळ आणि वातावरण होणाऱ्या बदलामुळे दमा असणाऱ्या व्यक्तीला त्रास जाणवतो. कुळीथ डाळ मध्ये असे अनेक पोषक घटक आहेत जे वातावरणातील बदलामुळे होणारे त्रास कमी करतात. दमा असणाऱ्या लोकांच्या आहारात कुळीथ (हुलगे) समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.

मासिक पाळीच्या तक्रारी

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्या जाणवतात. मासिक पाळीच्या समस्या मागे अनेक कारणे असू शकतात पण या वर लवकर उपचार केले नाही तर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते.

काही अभ्यासातून असे आढळले आहे की महिलांच्या मासिक पाळीच्या आणि आरोग्य तक्रारीवर कुळीथ गुणकारी आहे. या बद्दल अधिकृत पुरावे उपलब्ध नाहीत, पण कुळीथ डाळीचे आहारात समाविष्ट केल्यामूळे महिलांच्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

स्पर्म काऊंट वाढतो 

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

कुळीथ डाळ आहारात समाविष्ट केल्यामुळे पुरुषांचा स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. कुळीथ डाळ (horse gram) मध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम आणि अमिनो ऍसिड असतात. ज्याचा परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर चांगले होते.

कुळीथ मध्ये असलेले मिनरल्स मुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो. प्रजनन अवजवांमधील रक्ताभिसरण सुधारते. जर तुमचा स्पर्म काऊंट अथवा गुणवत्ता योग्य नसेल तर आहारात कुळीथाचा समावेश नक्की करा. 

बद्धकोष्ठता

कुळीथ (Horse gram) मध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. ज्या मुळे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. फायबर हे पोटासाठी आवश्यक पोषक घटकापैकी एक आहे जे पचन क्रिया सुलभ करते. कुळीथ हे पचण्यास हलके असते, आणि त्यात फायबर सुलभ प्रमाणात आढळते त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्यापासून मुक्त करते. पचन क्रिया सुलभ करण्यासाठी कुळीथचे आहारात नक्कीच समाविष्ट करावा.

Also Read: Plastic Pollution Information

यकृत

कुळीथचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत मिळते. जर हे कार्य सुरळीत झाले नाही तर पित्त, कफ, आणि वात दोश वाढतात त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्यास सुरवात होते.

कुळीथ मध्ये फ्लेवोनॉईड आणि पोलीफेनॉईल चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे यकृत आणि स्वादपिंड वर चांगला परिणाम होतो. कुळीथ चे आहारात समाविष्ट केल्याने पित्त, कफ आणि वात या सारख्या समस्याचे त्रास कमी होतात.

अतिसार (Diarrhea)

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय आणि त्याचे फायदे व नुकसान | Horse Gram in Marathi

डायरियामध्ये जुलाब आणि उलट्या होतात. त्यामुळे शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात निघून जाते आणि शरीरात डिहायड्रेटेशन होते. डायरिया हा लवकर बरा होता पण तो काहो दिवसात बरा झाला नाही तर हे चिंतेची बाब आहे. काही वेळेला पोटात इन्फेक्शन त्रास वाढू शकतो, त्यामुळे लवकरच उपचार करणे गरजेचे आहे. 

कुळीथ मध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आहे ज्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. आणि कुळीथ (Horse gram) मध्ये फ्लेवोनॉईड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे जुलाब अथवा डायरिया थांबवण्यासाठी प्रभावी ठरतात

अल्सर

पोटातील गंभीर आजरा पैकी एक आजार म्हणून पोटाचा अल्सर ओळखला जातो. कुळीथ डाळ मध्ये फ्लेव्होनॉइड्स असते जे अँटी अल्सर म्हणून काम करतात. ज्यामुळे अल्सरचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

कुळीथचे दुष्परिणाम (Side Effects of Horse Gram In Marathi)

कुळीथला आहारात समाविष्ट करण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. पण कुळीथला अतिप्रमाणात खाल्याने तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकते.

कुळीथ (horse gram) मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे अतिप्रमाणात कुळीथ चे सेवन केल्याने पोटात गॅस आणि सूज निर्माण होते. तसेच कुळीथ मध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरिरात जास्त प्रमाणात कॅल्शिअम जमा झाल्यास पोटात सूज येते व बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

कुळीथ डाळ आहारात समाविष्ट करण्याचे भरपूर फायदे आहेत, पण कुळीथ अतिप्रमाणात खाल्याने दुष्परिणाम देखील होतात म्हणून कुळीथ चे सेवन योग्य प्रमाणात करावा.

कुळीथ मधील पौष्टिक तत्त्वे (Nutritional Value of Horse Gram In Marathi)

कुळीथ (horse gram) मध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत जे आरोग्यावर चांगला परिणाम करतात. शंभर ग्रॅम कुळीथ मध्ये असलेले पौष्टिक तत्वे पुढील प्रमाणे दिले आहे.

कॅलरी 321
जीवनसत्व ब-1 0.42
लोह 8 मि. ग्रॅम
खनिजे 3 ग्रॅम
कर्बोदके 57.1 ग्रॅम
प्रथिने 22 ग्रॅम
स्नेह पदार्थ 0.5 ग्रॅम
तंतुमय पदार्थ 5 ग्रॅम
कॅल्शियम 287 मि. ग्रॅम
फॉस्फरस 311 मि. ग्रॅम

कुळीथचा उपयोग (Use of Horse Gram In Marathi)

कुळीथचा वापर स्वयंपाक मध्ये वेगवेगळ्या पध्दतीने केला जाऊ शकतो. मोड आलेल्या कुळीथ पासून त्याची उसळ आणि कुळीथ पावडरला पाणी किंवा लस्सी मध्ये मिक्स करून कुळीथ पाणी बनवू शकता.

निष्कर्ष

Horse gram In Marathi या लेखात कुळीथ डाळ आहारात समाविष्ट केल्याने होणारे फायदे आणि दुष्परिणाम, आणि कुळीथ डाळ चा वापर कसा करता हे दिले आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र व नातेवाईकां सोबत शेअर करा.

आणि आमच्या सोशल मीडिया पेजला Follow करा. जय हिंद जय महाराष्ट्र. 🚩

Leave a Comment

error: Content is protected !!