नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे www.rawneix.in वर. आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला समास मराठी व्याकरण बद्दल ची सर्व माहिती, उदाहरणे आणि pdf देणार आहे.
समास बद्दल थोडक्यात माहिती: सम+अस या संस्कृत धातूंपासून तयार झालेला आहे.
समास चा अर्थ: एकत्र करणे असा आहे.
समास वर सर्व परीक्षेत प्रश्न विचारले जाते म्हणून तुम्हाला समास म्हणजे काय?, समास कसे ओळखायचे? हे या पोस्ट मध्ये पाहयला मिळणार आहे.
Table Of Contents(toc)
Table of Contents
समास मराठी व्याकरण (Samas In Marathi)
समास हा शब्द सम+अस या संस्कृत धातूंपासून तयार झालेला आहे. समास शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा आहे. कधी-कधी आपण बोलण्याच्या ओघात काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो.
उदा: महान असा देव असे न म्हणता महादेव असे म्हणतो.
दुसरे उदाहरण: क्रीडेसाठी असलेला अंगण न म्हणता क्रीडांगण असे म्हणतो.
समास म्हणजे काय?
समास या शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा आहे. आपण बोलण्याच्या ओघात कधी-कधी काही शब्द वगळून सुटसुटीत असे जोडशब्दा बनवतो त्यास समास असे म्हणतात.
उदा: जन्मापासून न म्हणता अजनम असे म्हणतो.
- हे पण शिका: पत्र लेखन
- हे पण शिका: बातमी लेखन
- हे पण शिका: जाहिरात लेखन
समास, सामासिक शब्द, विग्रह आणि पद म्हणजे काय?
समास: दोन शब्दामध्ये विभक्तीचे प्रत्य किंवा शब्द गाळून जो संयुक्त शब्द तयार केला जातो. त्यास समास असे म्हणतात.
सामासिक शब्द: शब्दाच्या एकत्रिकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला समासिक शब्द असे म्हणतात.
उदा: सूर्य+उदय = सूर्योदय
क्रीडा+अंगण = क्रीडांगण
विग्रह: सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे त्याची फोड करून सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात.
पद: समासातील शब्दांना पद असे म्हणतात.
समासात किमान दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात व एकच शब्द तयार होतो.
समास व त्याचे प्रकार (Types Of Samas In Marathi)
येथे तुम्हाला समास व त्याचे प्रकार आणि पद सांगीतले आहे.
- प्रथम पद प्रधान – अव्ययीभाव समास
- द्वितीय पद प्रधान – तत्पुरुष समास
- दोनीही पदे प्रधान – दवंदव समास
- दोनीही पदे गौण (कमी महत्त्वाचे) – बहुव्रीही समास
असे मुख्य 4 प्रकार आहेत. आता यांच्या बद्दल सविस्तर माहिती करू.☺️
अव्ययीभाव समास
ज्या समासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. किंवा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुदा अव्ययी असून ते प्रमुख असते त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.
अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये
सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो.
पहिले पद हे प्रधान असते.
अव्ययीभाव समासात आ, यथा, प्रति असे संस्कृत उपसर्ग लागलेले असतात.
सामासिक शब्दाची रूपे क्रियेविषयी माहिती देतात.
अव्ययीभाव समास मध्ये हर, बे, दर, गैर, बीज इत्यादी फारसी उपसर्ग लागलेले असतात.
अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे
तत्पुरुष समास
कर्मधारय समास
कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील दोन्हीही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये
कधी-कधी दोन्हीही पदे एकरूप असतात. उदा: विद्याधन
कधी-कधी दोन्हीही पदे विशेषणे असतात. उदा: श्यामसुंदर
दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उत्तर पद किंवा दुसरे पद विशेषण असते. उदा: घननीळ
पर्वपद विशेषण असते: उदा: निलकमल
कर्मधारय समासाची उदाहरणे
विभक्ती तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीची अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्हीही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात.
विभक्ती तत्पुरुषाची वैशिष्ट्ये
सामासिक शब्दामध्ये प्रत्येकी दोन पदे असतात.
विभक्ती तत्पुरुष समास हा द्वितीय ते सप्तमी या विभक्तीमध्ये होतो.
विग्रह करताना पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय लागून दोन शब्दाचा संबंध समजावे.
काही ठिकाणी विभक्ती ऐवजी दोन पदातील अवव्ये गाळलेली असतात.
संभोधनाचा उपयोग केवळ हाक मारण्यासाठी असतो. म्हणून त्याचा समास नाही.
द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास
तृतीया विभक्ती तत्पुरुष समास
चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास
चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासात सर्व शब्दांना “साठी” हे शब्दयोगी अवव्य जोडतात.
पंचमी विभक्ती तत्पुरुष समास
षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास
सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास
सप्तमीचे प्रत्यय त, ई, आ, असते तरी शब्दांचा विग्रह करताना “तील” हे शब्दयोगी अवव्य जोडून येते.
द्विगु समास (Dvigu Samas Examples In Marathi)
ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असते. व संपूर्ण शब्दावरून एका सम्मूचचा चा अर्थबोध होतो. त्यास द्विगु समास म्हणतात.
दवंदव समास
ज्या समासातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे: समान दर्जाची असतात त्यास दवंदव समास असे म्हणतात.
दवंदव समासाचे प्रकार
- इतरेतर दवंदव समास
- वैकल्पिक दवंदव
- समहार दवंदव समास
असे तीन प्रकार पडतात.
इतरेतर दवंदव समास
ज्या दवंदव समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि, व, या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. त्यास इतरेतर दवंदव समास असे म्हणतात.
वैकल्पिक दवंदव
ज्या दवंदव समासाचा विग्रह करताना अथवा, वा, किंवा या विकल्प बोधक उभ्याणवी चा उपयोग करावा लागतो. त्यास वैकल्पिक दवंदव समास असे म्हणतात.
समहार दवंदव समास
ज्या दवंदव समासाचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच्या जातींच्या इतर पदाचा ही त्यात समावेश होतो त्याला समहार दवंदव समास असे म्हणतात.
सम+आहार = त्याच जातीचे आहार समाविष्ट असलेले.
बहुव्रीही समास
समास PDF
Samas pdf download आणि उदाहरणे pdf download करण्यासाठी खाली दिलेल्या download pdf button वर click करा.
अव्ययीभाव समास मराठी उदाहरणे PDF Download
Download PDF(download)
आमच्या आणखी मराठी व्याकरणाच्या पोस्ट्स ज्या तुम्हाला नक्कि आवडतील
🌹 Vakprachar In Marathi
🌹 Virudharthi Shabdh In Marath
Also Read: Samanarthi Shabd Hindi
निष्कर्ष
मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये समास मराठी व्याकरण ची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि सोबतच समास pdf ही दिली आहे.
तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. आणि अश्याच आणखी मराठी व्याकरण संबंधित पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉग च्या facebook page ला लाईक करा. आणि आपल्या google browser मध्ये bookmark करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.
Very good