Advertisement

महाराष्ट्राची मदर टेरेसा सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्राच्या प्रसिद्ध समाजसेविका पद्मश्री सिंधुताई यांचं निधन. ७४ वर्षीय वृद्धेने आज पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रात्री 8.10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सिंधुताई सपकाळ या अनाथ मुलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या मराठी समाजसेविका होत्या. आयुष्यात अनेक समस्या असतानाही त्यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे काम केले.

SindhuTai sapkal

(ads1)

सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags
close button