बातमी लेखन 2021-2022 – Batmi Lekhan In Marathi 10th Class PDF, फोटो, नमुने

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज Batmi Lekhan In Marathi या पोस्ट मध्ये तुम्हाला बातमी लेखनाचे संपूर्ण ज्ञान या पोस्ट मध्ये देणार आहे.

परीक्षेच्या दृष्टीने बातमी लेखन हे 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे परीक्षेत Batmi Lekhan या प्रश्नाला 6 गुण दिले जाते.

बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच वस्तू स्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे आज महत्वाचे कौशल्य आहे.

(ads2)


Table Of Contents(toc)

बातमी लेखन – Batmi Lekhan In Marathi

बातमी लेखन - Batmi Lekhan In Marathi

बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते.

मित्रांनो मी तुम्हाला Batmi Lekhana च्या नमुन्या सोबत बातमी लेखन फोटो, pdf देणार आहे जनेकरून तुम्हाला बातमी लेखन करताना सोपे होईल.

(ads2)

बातमी म्हणजे काय?

बातमी म्हणजे: ज्यात काय घडले? कसे घडले? कोणकोण उपस्थित होते? या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती म्हणजे बातमी.

Batmi Lekhan आवश्यक गुण

  • भाषेचे उत्तम ज्ञान 
  • लेखन कौशल्य
  • व्याकरणाची जाण
  • समग्र वाचन
  • सोपी सुटसुटीत वाक्यरचना

Batmi Lekhan करत असताना या गोष्टींचे भान राखणे महत्वाचे

  1. घटनेची विश्वासार्हता.
  2. घटनेचा अचूक व योग्य तपशील.
  3. तटस्थ भूमिकेतुन लेखन.
  4. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे.
  5. स्वतःच्या मनाची कोणतीही बाब समाविष्ट असु नये.

बातमी तयार करण्याचे निकष

शीर्षक (heading): बातमीचा मथळा हा संपूर्ण घटनेचा आरसा असतो.

दिनांक: घटना केंव्हा घडली.

स्थळ: घटना कुठे घडली.

संबधित व्यक्ती: घटना कोणाशी संबधितआहे.

या सर्व गोष्टींचा अचूक उल्लेख असावा

(ads2)

Batmi Lekhan In Marathi YouTube Video

Batmi Lekhan In Marathi नमुने.

लाल बहादुर शास्त्री विद्यालय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम….

दि. 25 सप्टेंबर 2021 लातूर: समाज विकास प्रशाला चाकूर येथे 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता 10 वी तील मेघा गायकवाड या विद्यार्थीनीने तयार केलेल्या घरगुती कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याच्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण दहा शाळांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे नाव लौकिकास साजेल असे यश मेघा गायकवाड हिने मिळवले. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रवेक्षक शिक्षक या सर्वांनी मेघाचे अभिनंदन केले आहे.

(ads2)

Batmi Lekhan Pdf Download

Pdf Preview

Download PDF(download)

निष्कर्ष

विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला Batmi Lekhan In Marathi या पोस्ट मध्ये बातमी लेखनाबद्दल सर्व महत्वाची माहिती आणि image, text, pdf स्वरूपात बातमी लेखन नमुने उपलब्ध करून दिले आहे.

तुम्ही हे pdf प्रिंट करून तुमच्या कडे ठेऊ शकता. तुम्हाला या पोस्ट मधून काही शिकायला मिळाले असेल तर या पोस्ट ला मित्रांसोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

1.8/5 - (5 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!