दत्त जयंती निमित्त शुभेच्छा | Datta Jayanti Quotes, Wishes And Status In Marathi

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती साजरी करण्यात येते. या वर्षी 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार गुरुदेव दत्त हे विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या दत्ताच्या स्थानाच्या ठिकाणी यादिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. अशा या पावन दिवशी आपल्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणी याना सोशल मीडियाच्या माध्यमातून दत्त जयंतीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Datta Jayanti Shubhechha In Marathi, Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi, Datta Jayanti Wishes In Marathi घेऊन आलो आहोत.

दत्त जयंतीच्या शुभेच्छा (Datta Jayanti Wishes In Marathi)

तुमचे सत्य चिरंतन

मिटवी सारी चिंता रे।

चिन्मय माझ्या चित्तातील

चैतन्य तूची दत्ता रे ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय |

सर्वांना दत्त जयंतीच्या

मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद

तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो

आणि तुमचे आयुष्य

सुखात जावो ही सदिच्छा!

त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,

त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर

होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,

गुरु माऊली चरणी माझा नमस्कार

दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

Also Read: गजानन महाराज यांचे सुविचार

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,

ते तुझ्या चरणाशी आहे,

कितीही मोठी समस्या असू दे,

तुझ्या नावातच समाधान आहे..!

दत्त महाराजांना सांगु नका

की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,

तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा

माझे महाराज मोठे आहेत.

!! श्री गुरुदेव दत्त!!

ज्याच्या मनी गुरु विचार

तो नसे कधी लाचार|

ज्याच्या अंगी गुरु भक्ती

त्याला नाही कशाची भीती|

ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती

त्याची होई जगभरात किर्ती|

जो करेल गुरु ची पूजा

त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा|

श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भक्ती भक्ती असायला श्रध्दा लागते,

श्रध्दा असायला विश्वास.

विश्वास असायला निष्ठा लागते,

निष्ठा असायला प्रामाणिकपणा,

प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात,

संस्कार असायला दिशा. आणि

दिशा दर्शवणारे.. दत्त गुरु

ब्रह्मदेवे आपुल्या करे ।

लिहिली असती दुष्ट अक्षरे

श्रीगुरुचरणसंपर्के ।

दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥

श्री दत्त जयंतीनिमित्त

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(ads1)

मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे ।

चतुर्दश्याम बुधे दिने ।

रोहिणी दिवस नक्षत्रे

अवतीर्णो दिगंबरा ॥ गुच ॥

दत्तगुरुंचे नाम स्मरा हो,

दत्तगुरुंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक,

असंहारक त्रिभुवनतारक

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ॐ श्री गुरुदेव दत्त,हया वेळेस आलेली दत्त जयंती फार विशेष आहे कारण माहीत आहे का?कारण हया वेळेस दत्त जयंती ला रोहिणी नक्षत्र आहे. हया उक्ति अनुसार श्री दत्त जन्म नक्षत्र रोहिणी आहे. हा काय योगा योग म्हणावा का दत्तकृपा.

दत्त जयंती कोट्स मराठीत (Datta Jayanti Quotes In Marathi)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

गुरुर्देवो महेश्वरः

गुरुसाक्षात् परब्रह्म

तस्मै श्रीगुरवे नमः

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना दत्त

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूवीण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read: श्री स्वामी समर्थ कोट्स मराठी

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,

अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे,

दत्तभजन भोजन मोक्षाचे

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद

वल्लभ दिगंबरा!!

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

जसे नदी पूर्वेला वाहिली काय

किंवा पश्चिमेला वाहिली काय

ती शेवटी सागरालाच मिळते

तसे कोणी मला भक्तीत पाहतो,

कोणी नामस्मरणात पाहतो,

कोणी ध्यानात पाहतो तर कोणी

त्यांच्या कर्मात पाहतो.

या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले

तरी ते शेवटी माझ्या दत्तमय

अश्या सागरालाच येऊन मिळतात.

!!श्री गुरुदेव दत्त!!

समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली ।

जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।

जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा ।

मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ।।

आता नको ही दिव्य दृष्टी

आता नको ही जड सृष्टी

फक्त असावी आपल्यावर

आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी

दत्त जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

भक्तांसाठी नेहमीच धावत

येतात अवधूतचिंतन

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी

आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या

संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो

आणि आपल्या आयुष्यात काय

सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

(ads1)

श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।

कृपा करा दयाघना

या जीवावर कृपा करा ॥

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त जयंती स्टेटस मराठीत (Datta Jayanti Status In Marathi)

Datta Jayanti Quotes, Wishes And Status In Marathi

आता नको दिव्यदृष्टी,

आता नको ही जडसृष्टी

फक्त असावी आपल्यावर,

आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी

व्हावी पूर्ण कृपा गुरू मजवरी

प्रारथीत भावे तुला ।

वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया

संमोह जो वाढला ।

अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी

शांती पदी बैसवी ।

विनंती हीच असे न मागत

तुझे भक्ती तुझी ही हवी ।।

ध्येय दूर आहे म्हणून

रस्ता सोडू नका,

स्वप्न मनात धरलेलं

कधीच मोडू नका

पावलोपावली येतील

कठीण प्रसंग,

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत

हार मानू नका –

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Datta Jayanti chya hardik Shubhechha)

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,

शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त दत्त दत्ताची गाय,

गायीचे दूध, दुधाची साय

सायीचं दही, दह्याचं ताक,

ताकाचं लोणी

लोण्याचं तूप, तुपाची धार,

दत्त दत्त दत्ताची गाय

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

गाणगापुरी वस्ती ज्याची,

प्रीति औदुंबर छायेसी

भीमा अमर संगमाची भक्ति,

असे बहुत सुशिष्यांची

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व

आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक

मंगलमय शुभेच्छा!!

(ads1)

‘दत्तनाम जपता जपेता दत्तरूप होऊन जावे ।।

* श्री विष्णवे नमः *

श्रीगुरु तोची ईश्वरु |

ईश्वरु तोची स्वये गुरु ।

म्हणोनिया गुरुभक्ती साचारु ।

देई भोग मुक्तिते ।।

Datta Jayanti Shubhechha In Marathi (दत्त जयंती शुभेच्छा मराठीत)

चरण शुभंकर फिरता तुमचे,

मंदिर बनले उभ्या घराचे

घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले

मला ते दत्तगुरु दिसले

श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास

आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक

मंगलमय शुभेच्छा!

दिवा होऊनी सूर्यप्रकाशी एकरूप व्हावे।

धागा होऊनी अवधुत छाटीत विणले जावे।।

शब्द होऊनी गुरुचरित्री सहभागी व्हावे।

शिकवितो जो जगण्याचा सार

तोच तू आमुचा एकमेव आधार

तू शिकवितो आम्ही

कसा करावा भवसागर पार

दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

दत्तकथा वसे कानी

दत्तमूर्ती ध्यानीमनी

दत्तालागी अलिंगना कर

समर्थ हे जाणा

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांना हा दिवस

अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो

ही सदिच्छा!

मन हे न्हाले भक्ती डोही ।

अनुसया उदरी धन्य अवतार ।।

केलासे उद्धार विश्वाचा या ।

माहुरगडावरी सदा कदा वास ।।

दर्शन भक्तास देई सदा ।

चैतन्य झोळी विराजे काखेत ।।

गाईच्या सेवेत मन रमे ।

चोविस गुरूचा लावियला शोध ।।

घेतलासे बोध विविधगुणी ।

गुरू तोच श्रेष्ठ

ज्याच्या उपदेशामुळे

कोणाचे तरी चरित्र सुधारते

दत्त दिगंबर

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,

हरपले मन झाले उन्मन

मी तूपणाची झाली बोळवण,

एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सृष्टीचे सर्जन,

अनोखे दर्शन,

त्रिमूर्तीस वंदन

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद

वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्ता दिगंबरा या हो

स्वामी मला भेट द्या हो

दत्ता दिगंबरा या हो

सावळ्या मला भेट द्या हो

सर्वांना दत्त जयंतीच्या

हार्दिक शुभेच्छा

दत्त जयंती कोट्स मराठीत (Datta Jayanti Quotes In Marathi)

दत्त येऊनी उभा ठाकला,

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला,

जन्ममरणाचा फेरा चुकवीला

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन

श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त माऊली माझे आई,

पहिला ठाव घ्यावा बाई

दिगंबरा दिगंबरा

दत्त जयंतीचा सुखकर आणि

मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी

सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो!

दत्त जयंती कधी आहे ? Datta Jayanti 2022 Date?

या वर्षी 7 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Datta Jayanti Shubhechha In Marathi, Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi आणि Datta Jayanti Wishes In Marathi आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment