पु. ल. देशपांडे यांचे विचार | Pu. La. Deshpande Quotes In Marathi

Pu La Deshpande Quotes In Marathi: पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. आणि त्यांच्या लोकप्रियते मुळे त्यांना सर्व पु.ल.देशपांडे अस म्हणतात. ते महाराष्ट्रातील महान लेखकांपैकी एक होते, ते फक्त लेखकच नसून संगीत दिग्दर्शक, पटकथाकारही होते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत त्यांच्या काही महत्वपूर्ण Pu. La. Deshpande Quotes ज्यांना वाचून जीवनाची शिकवण येईल.

पु. ल. देशपांडे यांचे विचार – Pu. La. Deshpande Quotes

मराठीला जी ‘मज्जा संस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘नर्व्हस सिस्टीम’ वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे

माणसाचे “केस गेलेले” असले
तरी चालतील….
पण….
माणुस हा “गेलेली केस”
असु नये……
– पु ल देशपांडे
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात
– पु.ल. देशपांडे
आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे…
– पु ल देशपांडे

Pu La Deshpande Quotes

शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच..
– पु.ल. देशपांडे
जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे
– पु.ल. देशपांडे
जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”.
– पु.ल. देशपांडे
सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
– पु ल देशपांडे
जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!
– पु.ल. देशपांडे
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
– पु.ल. देशपांडे
माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा
– पु.ल. देशपांडे

Pu La Deshpande Quotes On Life

पु. ल. देशपांडे यांचे विचार | Pu. La. Deshpande Quotes In Marathi
प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे
– पु ल देशपांडे
कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे काही व्यक्तित्व, जे काही अस्तित्व, जी काही अस्मिता असेल, जे गुण असतील, ते तुमचे स्वत:चे घेऊन तुम्हाला उभं रहावं लागतं. तुम्ही डिट्टो अमुक तमुक झालात कि डिट्टोच राहिलात आयुष्यभर.
– पु.ल. देशपांडे
परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे!.
– पु ल देशपांडे

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत…गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार…दिव्या दिव्यादिपत्कार…आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…दस-याला वाटायची आपट्याची पाने…पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.कुणाला विदेशी कपबशीचा…

चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे

पु. ल. देशपांडे यांचे विचार – Pu. La. Deshpande Thought in Marathi

खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.
– पु ल देशपांडे

चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात. फरक इतकाच कि, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही.

जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
– पु ल देशपांडे
बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.
– पु.ल. देशपांडे
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसं.
या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.
– पु ल देशपांडे

आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती.

Pu La Deshpande Quotes On Friendship

हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच – पोपट, मांजर आणि कुत्रा. एका इसमाने माकडही पाळलं होतं. पण दोघांच्या आचरटपणाची इतकी चढाओढ चालायची कि कोणी कोणाला पाळलंय हेच कळत नसे.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
– पु.ल. देशपांडे
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.
– पु ल देशपांडे
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
– पु ल देशपांडे
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
– पु. ल.
रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
– पु ल देशपांडे

Pu. La. Deshpande Quotes On Life

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते.
– पु ल देशपांडे
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य,
चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
– पु ल देशपांडे
शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.
– पु ल देशपांडे
जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.
– पु ल देशपांडे

चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून असतं. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

Pu. La. Deshpande Quotes In Marathi

खरं तर सगळे कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत.

कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ?
जसा मी तसा मी असा मी असा मी!…
खर सांगू का?
हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही.
मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय
तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे.
जगात काय म्हटलयं यापेक्षा
कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे
हे मला कळून चुकलंय.”
– पु ल देशपांडे

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.

बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण.
– पु ल देशपांडे
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
– पु ल देशपांडे
आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.
– पु ल देशपांडे
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
– पु.ल. देशपांडे
खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
– पु.ल. देशपांडे

झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!

Pu. La. Deshpande Funny Quotes

मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आयुष्यभर आठवत असते.

झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही.
माझीच नव्हे, कुणाचीच नाही!
मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय?
हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो.
आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते.
प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते.
विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
– पु ल देशपांडे
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
– पु ल देशपांडे
लग्नापुर्वी शी न लूक्ड सो … लुकडी!
– पु.ल. देशपांडे

Pu La Deshpande Famous Quotes

क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते

माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे…
– पु ल देशपांडे
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
– पु.ल. देशपांडे

कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला कि त्यातूनच स्वत:च्या पोरांना अमेरिकेला धाडून दुसऱ्याच्या पोरांना ‘शासकीय मराठीत शिका’ असा उपदेश करणारे पुढारी तयार होतात.

मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.
– पु.ल. देशपांडे

अश्या प्रकारच्या आणखी पोस्ट पहा 

Relationship Quotes In Marathi

Royal Attitude Status In Marathi

Marathi Attitude Dialogues

Miss You Status In Marathi

Funny Comments Marathi For Boy’s & Girl’s

आजच्या या लेखात पु. ल. देशपांडे यांचे विचार | Pu. La. Deshpande दिले आहेत. आपल्याला है लेख आवडेल असेल तर आपल्या परिवार आणि मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा.

Leave a Comment